onion
onion  
मुख्य बातम्या

नाशिकमध्ये कांदा दरात चढ-उतार सुरूच

टीम अॅग्रोवन

नाशिक : दिवाळीचा सण आणि रब्बी हंगामासाठी पैसा उभारण्यासाठी शेतकरी साठवलेला कांदा बाजारात आणत आहेत. तसेच काही नवीन खरीप कांदा बाजारात येण्यास प्रारंभ झाला आहे. शनिवारी (ता.७) कांदा दर काहीसे कमी होते. मात्र सोमवारी (ता.९) जिल्ह्यात सरासरी ५०० रुपयांपर्यंत दरात वाढ झाली. परंतु मंगळवारी (ता.१०) दरात पुन्हा  किंचित घसरण झाली. त्यामुळे बाजारात चढ-उतार सुरूच आहेत.  दिवाळीच्या सणाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कांदा बाजार आवारातील कामकाज बुधवारपासून  (ता. ११) बंद होत आहे. व्यवहार पुढील ८ दिवस बंद राहण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी साठवलेला शिल्लक उन्हाळ कांदा बाजारात आणायला सुरुवात केली आहे. मात्र सोमवारी दरात सुधारणा झाल्यानंतर पुन्हा काही ठिकाणी आवक वाढतीच असल्याने दरात पुन्हा काही अंशी घसरण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. मालेगाव बाजार समितीच्या मुंगसे उपबाजार आवारात दरात मात्र सुधारणा झाल्याचे पाहायला मिळाले. बाजारात कांद्याला गुणवत्तेनुसार बाजारात दर मिळत आहेत. मात्र असे असताना सध्या भारतीय कांद्यालाच ग्राहक पसंती देत असल्याने दरात वाढ होत आहे. त्यातुलनेत आयात केलेला कांदा व्यापारी अन् ग्राहकांनी नाकारल्याने उन्हाळ कांद्याची मागणी टिकून आहे. तर अद्यापही लाल कांद्याची आवक होत नसल्याने अजूनही बाजारातील मागणी पुरवठा या आवकेवर पूर्ण होत नसल्याची स्थिती आहे.

दर पाडण्याचा प्रकार सप्ताहाच्या सुरुवातीला दरात सुधारणा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी दरात घसरण झाली. त्यामुळे आवक वाढवून दर पाडण्याचा प्रकार असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. याविषयी शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Export : कांदा निर्यात खुली; मात्र अटी, शर्थींचा खोडा

Baramati Lok Sabha Election : नणंद की भावजय, कोण मारणार बाजी

Water Scarcity : नागरिकांची पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती

Sugar Industry : साखर उद्योग सौरऊर्जा निर्मितीत येणार

Summer Sowing : उन्हाळी पेरणी क्षेत्रात नऊ हजार हेक्टरने घट

SCROLL FOR NEXT