The flood situation in Sindhudurg district is critical
The flood situation in Sindhudurg district is critical 
मुख्य बातम्या

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पूरस्थिती गंभीर

टीम अॅग्रोवन

सिंधुदुर्गनगरी ः जिल्हयात मध्यरात्रीपासून ढगफुटीसदृश्य पाऊस सुरू आहे. त्यामुळे गंभीर पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. काहींच्या घरांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे. शेकडो एकर भातशेती पुराच्या पाण्याखाली गेली आहे. बहुतांशी मार्गावरील वाहतूक ठप्प आहे. खारेपाटण शहरात पुराचे पाणी शिरले. अनेक दुकाने पाण्याखाली गेली आहेत. घरे, गोठ्यांची मोठी पडझड झाली आहे. काही लोकांचे स्थलांतर करण्याची प्रकिया सुरू झाली आहे. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.  

जिल्ह्यातील ढगफुटीसदृश्य पावसामुळे सर्व नद्यांचे पाणी पात्राबाहेरून वाहत आहे. अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. खारेपाटण शहरात अनेक इमारती, दुकाने पाण्याखाली गेली आहेत. पाण्याच्या पातळीत वाढ होत आहे. सर्वाधिक उंचीचे तिथवली (ता. वैभववाडी) जामदा पुलावरून पुराचे पाणी वाहत आहे. खारेपाटण-गगनबावडा मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.

माणगाव खोऱ्यातील २७ गावांचा संपर्क तुटला आहे. सावंतवाडी तालुक्यातील शिरशिंगे पुलावरून पुराचे पाणी वाहत आहे. त्यामुळे मार्गावरील वाहतूक बंद झाली. उंबर्डे-फोंडा मार्ग ठप्प आहे. इतर सर्व ग्रामीण मार्गावरील वाहतूक पुर्णतःठप्प झाली आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Export : कांदा निर्यात खुली; मात्र अटी, शर्थींचा खोडा

Baramati Lok Sabha Election : नणंद की भावजय, कोण मारणार बाजी

Water Scarcity : नागरिकांची पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती

Sugar Industry : साखर उद्योग सौरऊर्जा निर्मितीत येणार

Summer Sowing : उन्हाळी पेरणी क्षेत्रात नऊ हजार हेक्टरने घट

SCROLL FOR NEXT