अंजनीसह पाच गावांची पाण्याविना आबाळ
अंजनीसह पाच गावांची पाण्याविना आबाळ 
मुख्य बातम्या

अंजनीसह पाच गावांची पाण्याविना आबाळ

टीम अॅग्रोवन

सांगली ः तासगाव तालुक्‍याचा पूर्वभागात भीषण टंचाईची स्थिती आहे. अंजनी तलावाखाली पाणी योजना पूर्णपणे बंद आहेत. अंजनीसह पाच गावांच्या पाणी योजना बंद असल्याने ग्रामस्थांची पाण्यासाठी पायपीट सुरू आहे. अंजनी तलावात पाणी नसल्याचा फटका अंजनी, डोंगरसोनी, वडगाव, नागेवाडीला बसत आहे.

माजी उपमुख्यमंत्री आर. आर. आबा पाटील यांच्यानंतर गावाची पाण्याबाबतीत आबाळ सुरू झाली आहे. तिच अवस्था परिसराची आहे. खुद्द अंजनी येथे वीस दिवस पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांवर भटकंती करण्याची वेळ आली आहे. तलावातून गावाला पाणीपुरवठा होतो. मात्र, तिथे पाणीच नसल्याने योजना बंद आहे. काही कूपनलिका, विहिरींतून होणारा पाणीपुरवठाही बंद झाल्याने ग्रामपंचायत दोन टॅंकरने पाणी पुरवण्याचा प्रयत्न करीत आहे.

तहसीलदारांना पत्र देऊन ग्रामपंचायतीने टॅंकर सुरू करण्याची मागणी केली आहे. जिल्हा ‘टॅंकरमुक्‍त’ असल्याने टॅंकर देण्यास प्रशासन टाळाटाळ करीत आहे. दरम्यान, अंजनीतील ग्रामस्थांनी तहसीलदारांना निवेदन देऊन घागर मोर्चाचा इशारा दिला आहे.

अशीच स्थिती डोंगरसोनी, वडगाव, नागेवाडी येथेही आहे. अंजनी तलावात पाणी नसल्याने पिण्याच्या पाण्याच्या योजना ठप्प आहेत. यावर्षी सुरवातीपासूनच पाऊस कमी झाला. विहिरी, कूपनलिकांनाही पुरेसे पाणी न आल्याने दूर अंतरावरून ग्रामस्थ पाणी मिळवत आहेत. अंजनी तलावातून सावळजसाठी केलेली पाणी योजनाही बंद आहे. सुदैवाने सिद्धेवाडी तलावातून पाणी मिळत असल्याने सावळजकरांची तीव्र टंचाईत दिलासा मिळाला आहे.

‘तासगाव पूर्व’ची नेहमी होरपळ काही वर्षे ‘म्हैसाळ’मधून अंजनी तलावात पाणी सोडले जात होते. दुष्काळाची दाहकता जाणवत नव्हती. मात्र आर. आर. आबा पाटील यांच्यानंतर अंजनी तलावात पाणी सोडण्यासाठी खूप धडपड करावी लागत आहे. सलग दुसऱ्या वर्षी पिण्याच्या व शेतीच्या पाण्याबाबतीत परवड सुरू झाली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

SCROLL FOR NEXT