सोलापुरात लघु पाटबंधारेच्या कामासाठी पाच कोटी
सोलापुरात लघु पाटबंधारेच्या कामासाठी पाच कोटी 
मुख्य बातम्या

सोलापुरात लघु पाटबंधारेच्या कामासाठी पाच कोटी

टीम अॅग्रोवन

सोलापूर : जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागासाठी यंदाच्या वर्षी जिल्हा नियोजन समितीमधून १३ कोटी ३२ लाख रुपयांची तरतूद केली आहे. मागील वर्षीची शिल्लक रक्कम १२ कोटी इतकी आहे, असे एकूण २५ कोटी ३२ लाख रुपये शिल्लक आहेत. मात्र, यापूर्वीचे देणे २० कोटी १९ लाख असल्याने यंदाच्या वर्षी या विभागाला केवळ पाच कोटी १३ लाखांचाच निधी उपलब्ध आहे. त्यानुसार सदस्यांनी कामे सुचवावी, अशी माहिती उपाध्यक्ष शिवानंद पाटील यांनी दिली. 

पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषदेत जल व्यवस्थापन समितीची बैठक झाली. त्यात हा निर्णय घेण्यात आला. सभापती विजयराज डोंगरे, मल्लिकार्जुन पाटील, रजनी देशमुख, शीला शिवशरण, बळिराम साठे, सुभाष माने, स्वाती शटगार, मंगल कल्याणशेट्टी उपस्थित होते. 

यंदाच्या वर्षासाठी पाच कोटी १३ लाखांचा निधी उपलब्ध आहे. तरीही त्याच्या दीडपट सात कोटी ६९ लाख रुपयांच्या कामाला जिल्हा परिषद सदस्यांच्या शिफारशी घेऊन त्या मंजुरीसाठी ठेवण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. 

तालुका स्तरावर पीकविमा सुविधा केंद्र

जिल्ह्यात ३५ गावांसाठी ३८२ टॅंकर सुरू आहेत. खरीप हंगामातील पीकविमा भरण्यासाठी २४ जुलै ही अंतिम तारीख आहे. यासाठी तालुका स्तरावर पीकविमा सुविधा केंद्र सुरू करण्याच्या सूचनाही पाटील यांनी दिल्या.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sadabhau Khot : 'आधी कडकनाथवर बोला', भर सभेत शेतकऱ्यांचा सदाभाऊ खोतांना सवाल

Onion Export Ban : केंद्र सरकारच्या चलाखीमुळे कांदा निर्यातीवरील लगाम कायम; शेतकऱ्यांना कितीपत फायदा होणार?

Kolhapur Water Shortage : गावांना टँकरद्वारे पाण्याची गरज, लोकप्रतिनिधी, प्रशासन निवडणुक कामात व्यस्थ

Agriculture Industry : उद्योगाच्या घरी रिद्धी-सिद्धी...

Success Story : अल्पभूधारकांच्या शेतात फुलली हिरवाई

SCROLL FOR NEXT