Five acres of soybeans set on fire
Five acres of soybeans set on fire 
मुख्य बातम्या

पाच एकरातील सोयाबीनला लावली आग

टीम अॅग्रोवन

यवतमाळ : केवळ अतिवृष्टीग्रस्त (६५ मिलिमीटरवर) शेतकऱ्यांनाच शासकीय मदत निधी मिळणार आहे, असे कळाल्यानंतर एका नुकसानग्रस्त शेतकऱ्याने पाच एकरांतील सोयाबीन सुडीला आग लावत आपला रोष व्यक्त केला. आपले नुकसान झालेले असतानाही नियम आडवे येत असल्याचा रोष या शेतकऱ्याने व्यक्त केला.

मनीष जाधव असं या शेतकऱ्याचं नाव असून ते महागाव (ता. वागद) येथील रहिवासी आहेत. यवतमाळ जिल्ह्यात कोरडवाहू पिकाखालील क्षेत्र सर्वाधिक आहे. सिंचनाची सुविधा नसल्याने शेतकरी सोयाबीन, कपाशी यासारखी पिके घेतात. यावर्षी संततधार पाऊस व ढगाळ वातावरणामुळे सोयाबीनला कोंब फुटले तर कपाशीची बोंड सडली.

त्यासोबतच पिकांवर कीड रोगांचा प्रादुर्भाव देखील वाढीस लागला त्याच्या नियंत्रणासाठी शेतकऱ्यांनी कीटकनाशकाची सातत्याने फवारणी केली. तरीही किडीवर नियंत्रण मिळवता आले नाही. या नुकसानीची दखल घेत शासनाकडून मदत मिळेल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. त्याकरिता सर्वेक्षण व पंचनामे होण्याची गरज आहे. यामुळे व्यथित झालेल्या वागद येथील शेतकरी जाधव यांनी काढणी केलेल्या गंजीला आग लावत भावना व्यक्त केल्या.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agricultural Exports : खेळखंडोबा शेतीमाल निर्यातीचा!

Lok Sabha Election 2024 : टपाली मतदानास १,६६२ मतदारांची पसंती

Lok Sabha Election 2024 : सात हजार कर्मचाऱ्यांना नोटीस पाठविण्यास सुरुवात

Banana Orchard Damage : सारी केळी भुईसपाट

Department Of Water Resources : ‘कृष्णा खोरे’ची ६६८ कोटींची पाणीपट्टी वसुली

SCROLL FOR NEXT