देशातील पहिल्या दोन कोरोनामुक्त व्‍यक्‍तींना डिस्‍चार्ज
देशातील पहिल्या दोन कोरोनामुक्त व्‍यक्‍तींना डिस्‍चार्ज  
मुख्य बातम्या

देशातील पहिल्या दोन कोरोनामुक्त व्‍यक्‍तींना डिस्‍चार्ज

टीम अॅग्रोवन

पुणे : जिल्‍ह्यात कोरोनाच्‍या पहिल्‍या ज्या  दोन व्‍यक्‍ती अॅडमिट झाल्‍या होत्‍या, त्‍यांच्‍या दोन्‍ही टेस्‍ट निगेटिव्ह आल्‍या आहेत,  त्‍यामुळे बुधवारी (ता.२५) त्‍यांना डीस्‍चार्ज देण्यात आला. दुस-या दिवशी जे  तीन पेशंट अॅडमिट झाले होते,  त्‍यांच्‍या  पहिल्‍या टेस्‍ट निगेटिव्ह आल्‍या आहेत,  त्‍यांच्‍या दुस-या टेस्‍ट घेत आहोत, त्‍या निगेटिव्ह आल्‍या तर त्‍यांना उद्या डिस्‍चार्ज दिला जाईल, अशी माहिती विभागीय आयुक्‍त डॉ. दीपक म्‍हैसेकर यांनी दिली.  गुढीपाडव्‍याच्‍या शुभेच्‍छा देतांनाच सर्वांच्‍या मदतीने कोरोनावर मात करू, असा विश्‍वासही त्‍यांनी व्‍यक्‍त केला.पुणे विभागातील कोरोनाच्‍या सद्यःस्थितीची माहिती देताना विभागीय आयुक्‍त डॉ. म्‍हैसेकर म्‍हणाले, पुणे विभागात एकूण  ८२५ नमुने घेतले होते, त्यांपैकी ७३७ चे अहवाल प्राप्‍त झाले. यामध्‍ये ६९२ अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर ३७ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. याचा अर्थ जवळजवळ ९० टक्‍के अहवाल निगेटिव्ह आलेत, ही समाधानाची बाब आहे.  पंतप्रधान श्री. मोदी यांनी २१ दिवसांचा लॉक डाऊन घोषित केला आहे. त्‍याचे नागरिकांनी कुठेही उल्‍लंघन करू नये, असे आवाहन करून ते म्‍हणाले,  या २१ दिवसांत आपल्‍या सर्वांची साथ, सर्वांचे सहकार्य  या परिस्थितीवर मात करण्‍यासाठी मदत करू शकते. कोणत्‍याही जीवनावश्‍यक वस्‍तू म्‍हणजे औषधी, भाजीपाला, अन्‍नधान्‍य आपल्‍यापर्यंत पोहोचण्याचा आमचा अटोकाट प्रयत्‍न राहील, प्रशासन यासाठी नियोजन करत आहे. आपण या नियोजनाला  सहकार्य करावे, असे आवाहनही त्‍यांनी केले. आरोग्‍य यंत्रणेने पहिले दोन पेशंट बरे व्‍हावे, यासाठी रात्रंदिवस अथक प्रयत्‍न केले. पुणे, पिंपरी चिंचवड तसेच  विभागाच्‍या इतर जिल्‍ह्यातील अधिकारी हे कोरोनाच्‍या प्रतिबंधासाठी काम करीत आहे, या सर्वांचे त्‍यांनी कौतुक केले.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Poultry Disease : उन्हामुळे कुक्कुटपालनात मरतुकीचे प्रमाण वाढले

Sugar Commissionerate : साखर उपपदार्थ विभागाची सूत्रे देशमुख यांनी स्वीकारली

Loksabha Election 2024 : खडकवासला मतदार संघातील मतदान केंद्रांना साहित्याचे वितरण

Sugar Export Ban : साखर निर्यातबंदीमुळे ऊस उत्पादकांच्या स्वप्नांची माती

Banana Rate : खानदेशात केळी दरात मोठी घसरण

SCROLL FOR NEXT