chaitry wari
chaitry wari 
मुख्य बातम्या

चारशे वर्षात पहिल्यांदाच वारकऱ्यांविना चैत्र वारी 

टीम अॅग्रोवन

सोलापूर ः सुमारे ४०० वर्षाची परंपरा असलेल्या चैत्री वारीला शनिवारी (ता.४) कोरोनाच्या संकटामुळे वारकरी पंढरीत येऊ शकले नाहीत. दरवर्षी लाखोच्या संख्येने वारकऱ्यांची असणारी वर्दळ यंदा मात्र झाली नाही. त्यामुळे मंदिर परिसरासह अवघ्या पंढरपुरात शुकशुकाट राहिला. इतिहासात पहिल्यांदाच वारकऱ्यांच्या गर्दीविना ही वारी पार पडली.  चैत्री एकादशीची श्री. विठ्ठल-रुक्मिणीमातेची महापूजा पहाटे मंदिर समितीचे सदस्य आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्या हस्ते सपत्नीक करण्यात आली. यानिमित्ताने मंदिराच्या गाभाऱ्यात सुमारे ४०० हून अधिक किलो गुलाब फुलांची सजावट करण्यात आली होती. त्यामुळे श्री. विठ्ठल-रुक्मिणीमातेची मूर्ती अधिकच लोभस दिसत होती. पहाटे महापूजा आणि नेहमीप्रमाणे नित्योपचार पार पडले. या वेळी आमदार ठाकूर म्हणाले, संकटाच्या काळात चैत्री वारीतील विठ्ठलाची पुजा मला सर्वांचा प्रतिनिधी म्हणून करण्याचे भाग्य लाभले, देशावर आलेल्या कोरोनाच्या संकटाशी मुकाबला करण्याचे धैर्य आणि बळ देऊन सर्वांची या संकटातून लवकर मुक्तता कर, असे साकडे श्री. विठ्ठलाला घातल्याचे सांगितले.  यावेळी मंदिर समिती सदस्य संभाजी शिंदे, उपविभागीय अधिकारी तथा श्री.विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी, नायब तहसीलदार तथा व्यवस्थापक बालाजी पुदलवाड, विभाग प्रमुख अमित नवले, श्रीकांत सानप उपस्थित होते. दरम्यान, वारीकाळात एरव्ही मंदिर परिसर आणि अवघ्या पंढरपुरात वारकऱ्यांच्या वर्दळीने रस्ते व्यापून गेलेले असतात, पण यंदा अशी कोणतीही वर्दळ आज पंढरपुरात दिसत नव्हती, असे चित्र पहिल्यांदाच अनुभवायला आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Export : कांदा निर्यातबंदी उठवली, मात्र निर्यात वाढणार नाही याचीही सोय केली

Indian Monsoon : पाऊसकाळ उत्तम, पुढे काय?

Bachchu Kadu : देशात धर्म नाहीतर शेतकरी संकटात, बच्चू कडूंचा विरोधकांवर 'प्रहार'

Water Scarcity : आडातच नाही, तर...

Agriculture Department : राज्याला मिळेना विस्तार संचालक

SCROLL FOR NEXT