The first round of 'Takari' is likely to start today
The first round of 'Takari' is likely to start today 
मुख्य बातम्या

‘ताकारी‘चे पहिले आवर्तन आजपासून सुरू होण्याची शक्यता

टीम अॅग्रोवन

सांगली ः ताकारी उपसा योजनेतून तात्काळ पाणी सोडावे, अशी लाभक्षेत्रातील सर्व शेतकऱ्यांची तीव्र मागणी लक्षात घेऊन पाणी सोडण्याचे नियोजन झाले आहे. पहिले आवर्तन २५ डिसेंबरपासून सुरू करणार असल्याची माहिती पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी दिली आहे.

ताकारी उपसा सिंचन योजनेच्या लाभ क्षेत्रातील कडेगाव, खानापूर, तासगाव आणि पलूस तालुक्यांतील अनेक गावात पाणीटंचाई सुरू झाली आहे. रब्बीसह ऊसशेतीही वाळू लागली आहे. काही गावांच्या पाणीपुरवठा योजनांवरही परिणाम झाला असून, पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवू लागले आहे. या संदर्भात गावोगावी उठाव होऊन पाणी मागणीने जोर धरला आहे. वास्तविक पहिले पाणी महिन्यापूर्वी यायला हवे होते. मात्र, मुख्य कालव्यावरील बंधाऱ्यांची दुरुस्ती असल्याने आवर्तन सोडण्यास विलंब होत आहे.

या योजनेच्या लाभ क्षेत्रातील १४ हजार ५०० हेक्टरवरील पिकांना पाणी देण्याचे नियोजन आहे. त्यानुसार साटपेवाडी बंधाऱ्याचे गेट दुरुस्ती, टप्पा १ आणि २ वरील पंपांची चाचणी, मुख्य कालव्यातील अडथळे हटविणे, तसेच कोयनेतून पाणी सोडण्यासाठी पत्रव्यवहार करावे लागणार आहे.

पाटबंधारेने नियोजन न केल्याने शेतीचे नुकसान झाले. आठवड्यापासून देवराष्ट्रे व वांगी येथील ताकारी कार्यालयावर शेतकऱ्यांचे मोर्चे धडकू लागल्यावर पाटबंधारेने पाणी सोडण्याची हालचाल सुरू केली. संबंधित कार्यवाही व कामे गतीने होत असली तरी २५ डिसेंबरपर्यंत पाणी येणे अशक्‍य आहे, अशी पूष्टी पाटील यांनी जोडली.

शेतकऱ्यांची मागणी कोयनेतून पाणी सोडण्यासाठी पत्रव्यवहार करणे सुरू केले आहे. कोयनेतून पाणी सोडल्यानंतर ताकारी योजनेचे आर्वतन सोडले जाईल. - प्रकाश पाटील, कार्यकारी अभियंता,  ताकारी उपसा सिंचन योजना

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage : एप्रिलमध्ये पिकांचे २७ कोटींचे नुकसान

Agriculture Irrigation : आक्रोश मोर्चाचे रूपांतर उपोषणात

Cotton Cultivation : सरासरीच्या तुलनेत यंदा कपाशीची लागवड वाढणार

Book Review : ऋग्वेदाच्या पौराणिक अन् वैज्ञानिक स्पष्टीकरणाचा प्रयत्न

Drought Monitoring : दुष्काळ पाहणी पथकांचा सोपस्कार

SCROLL FOR NEXT