Fire on the fourth floor of the ministry in Mumbai
Fire on the fourth floor of the ministry in Mumbai 
मुख्य बातम्या

मुंबईत मंत्रालयातील चौथ्या मजल्यावर आग

टीम अॅग्रोवन

मुंबई : मुंबईत मंत्रालयातील चौथ्या मजल्यावर सोमवारी (ता. ३०) रात्री आग लागली. ही आग अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी आटोक्यात आणली. सात मजली असलेल्या या इमारतीच्या चौथ्या मजल्यावर ही आग लागली होती.

आगीच्या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळावर अग्निशामक दलाच्या पाच गाड्या दाखल झाल्या. रात्री ९च्या सुमारास ही आग लागली होती. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

चौथ्या मजल्यावरील आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या कार्यालयाशेजारी असेलेल्या कार्यालयाला ही आग लागली होती. याची माहिती मुंबई अग्निशमन दलाकडून देण्यात आली. याआधीही मंत्रालयाला आग लागली होती. २०१२ च्या जून महिन्यात मंत्रालयाला भीषण आग लागली होती. आतापर्यंत मंत्रालयात लागलेली ही सर्वात मोठी आग होती.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Export Ban : केंद्र सरकारच्या चलाखीमुळे कांदा निर्यातीवरील लगाम कायम; शेतकऱ्यांना कितीपत फायदा होणार?

Kolhapur Water Shortage : गावांना टँकरद्वारे पाण्याची गरज, लोकप्रतिनिधी, प्रशासन निवडणुक कामात व्यस्थ

Agriculture Industry : उद्योगाच्या घरी रिद्धी-सिद्धी...

Success Story : अल्पभूधारकांच्या शेतात फुलली हिरवाई

Onion Export : कांदा निर्यातबंदी उठवली, मात्र निर्यात वाढणार नाही याचीही सोय केली

SCROLL FOR NEXT