Financial support to farmers without costly chinch crop in Ambad
Financial support to farmers without costly chinch crop in Ambad 
मुख्य बातम्या

अंबडमध्ये विना खर्चिक चिंच पिकाचा शेतकऱ्यांना आर्थिक आधार

टीम अॅग्रोवन

अंबड, जि. जालना : शेतीवर सतत संकटाची मालिका सुरू असली, तरी जवळपास शून्य खर्चावर आधारित चिंच पीक शेतकऱ्यांना किमान आर्थिक आधार देण्याचे काम करीत असल्याचे चित्र आहे. 

सततचा दुष्काळ पाठ सोडायला तयार नाही. त्यातच ‘कोरोना’सारखे महाभयंकर संकट जगावर आले आहे. सुरक्षितता व स्वच्छतेसाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. लॉकडाउन सुरू आहे. यामुळे बाजारपेठा व वाहतूक व्यवस्था जवळपास ठप्प आहे. दुष्काळ व नैसर्गिक आपत्तीत होरपळलेल्या शेतकऱ्यांची अवस्था फारच बिकट आहे. 

खरिपाबरोबरच रब्बीचे पिकही हाती लागलेले नाही. सर्व काही हिरावून घेतले आहे. मात्र, अशा परिस्थितीत पूर्वजांनी भविष्याचा दृष्टीकोन अंगी बाळगत बिगर पाण्यात येणारी चिंचेची झाडे लावली. 'वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी' म्हणत पर्यावरणाचा समतोल आबाधित ठेवत चिंचेच्या झाडाचे संगोपन केले. यामुळे सावलीचा आधार तर मिळालाच, पण झाडाची निगा राखताना ना पाण्याची गरज ना खत, औषधाची फवारणी करण्याची कधी गरज. तरीपण विना खर्चिक उत्पन्न देणारी चिंचेची झाडे आजही तिसऱ्या पिढीसाठी उपयुक्त ठरत आहेत.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Export : कांदा निर्यातबंदी उठवली, मात्र निर्यात वाढणार नाही याचीही सोय केली

Indian Monsoon : पाऊसकाळ उत्तम, पुढे काय?

Bachchu Kadu : देशात धर्म नाहीतर शेतकरी संकटात, बच्चू कडूंचा विरोधकांवर 'प्रहार'

Water Scarcity : आडातच नाही, तर...

Agriculture Department : राज्याला मिळेना विस्तार संचालक

SCROLL FOR NEXT