संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
मुख्य बातम्या

गूळ उत्पादकांना आर्थिक फटका

टीम अॅग्रोवन

सांगली : शिराळा तालुक्‍यात गूळ उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. मात्र, साखरेच्या दरात झालेल्या घसरणीचा फटका गुळाच्या दरावरही झाला आहे. गेल्या वर्षी गुळाला प्रतिक्विंटल ४ हजार ५०० रुपये असा दर होता. मात्र, यंदाच्या हंगामात सुमारे १ हजार ५०० हजार रुपायांनी गुळाचे दर खाली आले आहे. गुळाला प्रतिक्विंटल तीन हजार रुपये इतका दर मिळात असल्याने गूळ उत्पादकांना मोठा आर्थिक फटका बसत आहे.

शिराळा तालुका हा गूळ उत्पादनाचे आगार मानले जाते. परंतु मजुरांची टंचाई आणि गूळनिर्मितीसाठी लागणारा कुशल गुळव्या यांची वानवा असल्याने गुऱ्हाळघरे संकटात आली आहेत. असे असतानादेखील तालुक्‍यात यंदाच्या हंगामात अंदाजे १० गुऱ्हाळघरे सुरू झाली होती. या तालुक्‍यात साखर कारखानेही आहेत. त्याचप्रमाणे कोल्हापूर जिल्ह्याची हद्द काहीच अंतरावर आहे. कारखाना आणि गुऱ्हाळघरांमध्ये स्पर्धा होते. तालुक्‍यात गेल्या वर्षीपेक्षा उसाचे क्षेत्र कमी झाले आहे. यामुळे गूळ उत्पादनासाठी गुळाची कमतरता भासू लागली. त्यातच साखरेच्या उतरलेल्या दराचा फटका गूळ उद्योगाला बसत असल्याने उत्पादन व व्यवस्थापन खर्च वाढला आहे. यामुळे गूळ उद्योग संकटात सापडला आहे.  

अपेक्षित दर नाही शिराळा तालुक्‍यातील सर्वच गूळ उत्पादक शेतकरी कऱ्हाड (जि. सातारा) येथील बाजार समितीत गुळाची विक्री करतात. हंगाम सुरू होताना गुळाचे दर चांगले होते. मात्र, साखरेच्या दरात ज्या पद्धतीने घसरण सुरू झाली, त्याचा फटका गुळाच्या दरावर झाला असे गूळ उत्पादक शेतकऱ्यांनी सांगितले. यामुळे बाजार समितीत गेल्या वर्षी ४ हजार ५०० पाचशे रुपये मिळत होता. यंदा याच गुळाला १ हजार ५०० पाचशे रुपयांनी दर कमी झाले. गुळाच्या दरात घसरण झाल्याने गूळ उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.

गुळाचा हंगाम थंडावला ऊसटंचाई आणि मजुरांची टंचाई याचा फटका गूळ उत्पादनावर बसला आहे. गेल्या वर्षी शिराळा तालुक्‍यात ऊस मुबलक होता. त्यामुळे मार्चच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत गुऱ्हाळ घरे सुरू होती. मात्र, यंदाच्या हंगामात गुळाचे कमी झालेले दर, ऊसटंचाई आणि मजुराची कमतरता यामुळे गुऱ्हाळघरे थंडावू लागली आहेत.

माझे स्वतःचे गुऱ्हाळघर आहे. तालुक्‍यात उसाचे क्षेत्र कमी झाल्याने गुऱ्हाळघरासाठी ऊस कमतरता भासू लागली. त्यातच गेल्या वर्षीपेक्षा गुळाला १५०० रुपयांनी दर कमी मिळतोय. यामुळे आर्थिक नुकसान मोठे आहे. - अमर मुलाणी, गुऱ्हाळ घरमालक व गूळ उत्पादक शेतकरी, कोकरूड, जि. सांगली

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage : एप्रिलमध्ये पिकांचे २७ कोटींचे नुकसान

Agriculture Irrigation : आक्रोश मोर्चाचे रूपांतर उपोषणात

Cotton Cultivation : सरासरीच्या तुलनेत यंदा कपाशीची लागवड वाढणार

Book Review : ऋग्वेदाच्या पौराणिक अन् वैज्ञानिक स्पष्टीकरणाचा प्रयत्न

Drought Monitoring : दुष्काळ पाहणी पथकांचा सोपस्कार

SCROLL FOR NEXT