हवामान आधारित फळपीक विम्याची अखेर घोषणा; आंबिया बहारासाठी संरक्षण
हवामान आधारित फळपीक विम्याची अखेर घोषणा; आंबिया बहारासाठी संरक्षण 
मुख्य बातम्या

हवामान आधारित फळपीक विम्याची अखेर घोषणा; आंबिया बहारासाठी संरक्षण

टीम अॅग्रोवन

पुणे: प्रतिकूल हवामानात पिकांच्या होणाऱ्या नुकसानीत शेतकऱ्यांना विम्याचे संरक्षण मिळावे, यासाठीच्या हवामान आधारित फळपीक विमा योजना २०१९ला आंबिया बहरामध्ये राबविण्यास मंजुरी मिळाली आहे. द्राक्ष, डाळिंब, केळी, संत्रा, मोसंबी, आंबा व काजू या सात फळपिकांसाठी ३० जिल्ह्यांमध्ये चार समूहांत योजना राबविण्यात येणार असल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे. पाऊस, तापमान, आर्द्रता, गारपीट आणि वेगाचे वारे आदी हवामानाच्या धोक्यांपासून होणाऱ्या नुकसानीपासून विमा संरक्षण या सात फळपिकांना मिळणार आहे. योजनेत कुळाने, भाडेपट्ट्याने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसह सर्व शेतकऱ्यांना सहभागी होता येणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी विविध वित्तीय संस्थेकडून कर्ज घेतले असतील अशा सर्व शेतकऱ्यांना ही योजना सक्तीची असून, बिगर कर्जदारांना ऐच्छिक असणार आहे. हवामान आधारित फळपीक विमा योजना २०११-१२ राज्यात सुरू झाली. त्यानंतर २०१६ च्या मृग बहरापासून समूह (क्लस्टर) पद्धतीने राबविण्यात येत आहे. राज्यात मृग बहरासाठी पाच व आंबिया बहरासाठी चार समूह तयार करण्यात आले आहेत. 

यंदा एकच कंपनी गेल्या वर्षी योजनेसाठी न्यू इंडिया एश्योरन्स  कंपनी आणि कृषी विमा कंपनी यांचा सहभाग होता.  यंदा मात्र, फक्त भारतीय कृषी विमा कंपनी लि. राज्यात फळपीक विमा राबविणार आहे. टोल फ्री. नंबर : १८००१०३००६१ 

ऑनलाइन अर्ज योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांनी कॉमन  सर्व्हिस सेंटर (सीएससी) मार्फत ऑनलाइन अर्ज करणे आवश्‍यक आहे. तसेच समवेत ७/१२, आधार कार्ड, बँक खाते तपशील लागणार आहे. अधिक माहितीसाठी तालुका कृषी कार्यालयात संपर्क साधण्याचे आवाहन विभागाने केले आहे.  असे आहेत जिल्हा समूह  समूह १ :  सोलापूर, नगर, जालना, पुणे, पालघर, सातारा, नांदेड, नागपूर, यवतमाळ  समूह २:  सांगली, औरंगाबाद, धुळे, अमरावती, अकोला, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, नंदुरबार  समूह ३:  जळगाव, बुलडाणा, लातूर, रायगड, उस्मानाबाद, रत्नागिरी, परभणी समूह ४:  बीड, ठाणे, नाशिक, वर्धा, वाशीम, हिंगोली.

असा असेल विमा हप्ता (हेक्टरी) 

अ.क्र. पिकांचे नाव  नियमित  गारपीट  एकूण विमा हप्ता 
1 द्राक्ष १५ हजार ४००  ५ हजार १३३   २० हजार ५३३ 
2 केळी ६ हजार ६०० २ हजार २००  ८ हजार ८००    
3 आंबा  ६ हजार ५० २ हजार १७   ८ हजार ६७ 
4  डाळिंब   ६ हजार ५०   २ हजार १७  ८ हजार ६७ 
5 काजू ४ हजार २५०  १ हजार ४१७   ५ हजार ६६७ 
6 संत्रा ३ हजार ८५० १ हजार २८३   ५ हजार १३३ 
7 मोसंबी     ३ हजार ८५० १ हजार २८३   ५ हजार १३३ 

कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना विमा काढण्याची अंतिम मुदत

  • द्राक्ष, मोसंबी, केळी  : ७ नोव्हेंबर 
  • संत्रा, काजू, आंबा (कोकण) :  ३० नोव्हेंबर 
  • आंबा (इतर जिल्हे) :  ३१ डिसेंबर 
  • डाळिंब :  १४ जानेवारी २०२०
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Orange Farmer : निवडणूक काळात संत्रा उत्पादक उपेक्षित

    Chara Chavani : चारा छावण्या सुरू करण्याची पशुपालकांची मागणी

    Cotton Sowing : महाराष्ट्रात कापसाचा पेरा राहणार ४२ लाख हेक्टरवर

    Animal Heat Stress : वाढत्या उष्म्याचा पशुधनाला धोका

    Agriculture Technology : शेती तंत्रज्ञान, पिकांबाबत शेतकरी साक्षर असणे गरजेचे

    SCROLL FOR NEXT