krushi vighag
krushi vighag 
मुख्य बातम्या

कृषी विभागाच्या विविध पुरस्कारांसाठी अर्ज सादर करण्यास २५ पर्यंत मुदत 

टीम अॅग्रोवन

बुलडाणा : कृषी विभागाच्यावतीने देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू असून शेतकऱ्यांनी त्यांचे प्रस्ताव शुक्रवारपर्यंत (ता.२५) सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार, डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार, वसंतराव नाईक कृषी भूषण पुरस्कार, जिजामाता कृषी भूषण पुरस्कार व उद्यान पंडित पुरस्कारांचा समावेश आहे. 

वसंतराव नाईक कृषी भूषण व जिजामाता कृषी भूषण पुरस्काराचे स्वरूप ५० हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह आहे. यासाठी कृषी क्षेत्रात संघटनात्मक कार्य करणारे शेतकरी, गट, संस्था त्यांचे कार्य संपूर्ण राज्याला दिशादर्शक असावे. प्रस्तावित शेतकरी हा वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार प्राप्त असावा. शासनाकडून यापूर्वी दिलेल्या पुरस्काराचा किमान ५ वर्षापेक्षा जास्त कालावधी पूर्ण झालेला असावा. जिजामाता कृषी भूषण पुरस्कारासाठी शेतीची अट नाही. हा पुरस्कार महिला शेतकऱ्यांना देण्यात येतो. वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्काराचे स्वरूप ११ हजार रूपये धनादेश व स्मृती चिन्ह आहे. या पुरस्कारासाठी स्वत:च्या नावावर शेती असावी व तो कुटूंबासह शेती करणारा असावा, शेतीपूरक व्यवसायाव्यतिरिक्त इतर कोणताही व्यवसाय किंवा नोकरी करणारा नसावा. आदिवासी शेतकऱ्यांच्या बाबतीत जातीचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. शेतकऱ्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या स्वाक्षरीचा दाखला मूळ प्रतीत दाखल करणे आवश्यक असून प्रस्तावित शेतकऱ्याकडे पाच किंवा त्यापेक्षा जास्त सालदार नसावेत. 

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी रत्न पुरस्काराचे स्वरूप ७५ हजार रूपये रोख व सन्मानपत्र आहे. हा पुरस्कार केवळ उल्लेखनीय कार्य करणाऱ्या एकच व्यक्ती/ गट/ संस्थेस देण्यात येतो. यासाठी शेतकरी, गट किंवा संस्थेस मागील २० ते २५ वर्षांचा शेतीतील अनुभव असावा. कोरडवाहू शेतीकरिता कार्य व कोरडवाहू तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर करणारा असावा. 

  शेतीनिष्ठ पुरस्काराचे स्वरुप  वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्काराचे स्वरूप ३० हजार रूपये रोख व स्मृतिचिन्ह आहे. या पुरस्काराकरिता खेड्यामधून परसबाग वृद्धींगत करणाऱ्या महिलांचाही विचार करण्यात येतो. तसेच सक्रिय कृषी विज्ञान मंडळ किंवा शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या क्रियाशील सभासद प्रमुखांचा विचार करण्यात येतो. उद्यान पंडित पुरस्काराचे स्वरूप २५ हजार रूपये रोख व स्मृतिचिन्ह आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : कापूस वायद्यांमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, गहू यांचे काय आहेत दर ?

Agriculture Update : विकसित केलेले वाण शेतकऱ्यांनी वापरावे : कलंत्रे

Fodder Shortage : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ११.८७ लाख टन चाऱ्याची उपलब्धता

PM Narendra Modi : 'मागील ६० वर्षांच्या काळात एससी/एसटी/ओबीसींची सर्वात वाईट अवस्था'; मोदी यांची काँग्रेसवर टीका 

Maharashtra Rain : उद्यापासून पावसाची स्थिती काय राहील? राज्यातील बहुतांशी ठिकाणी ऊन आणि पावसाचा अंदाज

SCROLL FOR NEXT