तूर
तूर 
मुख्य बातम्या

अनसिंग केंद्रावरील तूर घोटाळ्यात २४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

टीम अॅग्रोवन

वाशीम : नाफेडच्या माध्यमातून अनसिंग येथील केंद्रावर विदर्भ कृषी प्रक्रिया व पणन सहकारी संस्थेच्या संचालकांनी शेतकऱ्यांची फसवणूक केली. व्यापाऱ्यांचा माल मोजून घेतल्याप्रकरणी संस्थेचे सर्व संचालक व काही व्यापाऱ्यांविरुद्ध अनसिंग पोलिस ठाण्यात गुरुवारी (ता. २६) रात्री दहा वाजता गुन्हा दाखल करण्यात आला.  गतवर्षीच्या रब्बी हंगामानंतर शासनाने बाजार हस्तक्षेप योजनेअंतर्गत तूर खरेदी सुरू केली. अनसिंग येथील उपबाजाराची तूर खरेदी करणारी एजन्सी म्हणून विदर्भ कृषी प्रक्रिया व पणन सहकारी संस्थेची नियुक्ती केली होती. तूर खरेदी सुरू असताना योगेश बद्रीनारायण राठी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे. तक्रारीमध्ये विविध बाबींबरोबरच नाफेडने नियुक्त केलेल्या एजन्सीच्या वही खात्यामध्ये शेतकरी आणि व्यापाऱ्यांच्या मर्जीतल्या कथित शेतकऱ्यांची चौकशी करावी, व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या नावावर तूर विक्री करून तुरीचे धनादेशसुद्धा नेल्याची बाब नमूद केली होती. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने या प्रकरणाची चौकशी केली. यामध्ये अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. या चौकशीमध्ये लाखोंच्या रकमा एकाच खात्यात वारंवार भरल्या गेल्या. या प्रकरणी चौकशी अधिकारी ओमप्रकाश साळुंखे यांनी अनसिंग पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती.  या फिर्यादीवरून १७ ऑक्टोबरला संस्थेचे व्यवस्थापक बाबाराव दर्याजी लोथे, व्यापारी नंदकिशोर भगवानदास सारडा, प्रदीप विष्णूदास बजाज, रतनलाल मदनलाल हुरकट यांच्यासह एका शेतकऱ्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर हरीश सारडा यांनी गेल्या चार दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करून इतर संचालकांवरही गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी गोदामातील तुरीची पाहणी केल्यानंतर गुरुवारी (ता. २६ ) गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यावरून रात्री उशिरा जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने अनसिंग पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून संस्थेचे अध्यक्ष पांडुरंग ठाकरे, व्यवस्थापक बाबाराव लोथे, संचालक रामराव घोलप, केशव ठाकरे, माणिक सातव, प्रकाश दंडे, माधव ठाकरे, विजय सूर्यवंशी, विष्णू काटेकर, विठ्ठल गोटे, राजेंद्र सावरे, माधव बोंद्रे, विश्‍वनाथ रंणखाब, सखाराम थोरात, महादेव ढोके, अनुसया ठाकरे, कांताबाई मुसळे, लक्ष्मण मुसळे, रमेश जाधव, नंदू सातव, सुरेश दंडे, शाम पाले, गंगाराम चौधरी, गणेश चौधरी यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले अाहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Animal Care : वाढत्या उष्णतेचा पशुधनास फटका

Public Well Policy : सार्वजनिक विहिरींच्या पुनरुज्जीवनावर धोरण काय?

Agriculture Irrigation : ‘म्हैसाळ’चे पाणी माडग्याळ शिवारात

Jalgaon Lok Sabha : ...तर जळगावचे चार खासदार पोहोचतील लोकसभेत

Banana Orchard Burn : सातपुड्याच्या पायथ्याशी केळी बागा करपल्या

SCROLL FOR NEXT