Fifteen dams in Atpadi taluka were filled through Tembhu scheme
Fifteen dams in Atpadi taluka were filled through Tembhu scheme 
मुख्य बातम्या

टेंभू योजनेतून आटपाडी तालुक्यातील पंधरा बंधारे भरले

टीम अॅग्रोवन

आटपाडी, जि. सांगली ः टेंभू योजनेच्या पाण्यातून तालुक्यातील सात तलाव भरले असून दोन तलावांत सध्या पाणी चालू आहे. याशिवाय तीन ओढ्याला पाणी सोडून ओढ्यावरील पंधरावर बंधारे भरले आहेत. या टेंभूच्या पाण्याचा शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

टेंभू उपसा सिंचन योजना आटपाडी तालुक्याला वरदान ठरली आहे. पारंपरिक शेती करणारे शेतकरी पाणी आल्यामुळे मोठ्या संख्येने द्राक्षबागा लावण्याकडे वळले आहे. डाळिंब क्षेत्रातही वाढ झाली आहे. भाजीपाला क्षेत्राची वाढ होत चालली आहे. याशिवाय इतर कडधान्याची पिके ही या पाण्याच्या जोरावर घेतली जात आहे. यावर्षी आटपाडी तालुक्यात सात एप्रिलला टेंभू योजनेचे पाणी आले. घाणंद तलाव भरुन तेथून कटरेवस्ती पाझर तलाव, मिटकी साठवण तलाव, हिवतड पाझर तलाव, बनपुरी तलाव, शेटफळे येथील रेबाई तलाव आणि दिघंची येथील तलाव टेंभूच्या पाण्याने भरले आहेत.

सध्या कचरेवस्ती आणि आटपाडी तलावात पाणी चालू आहे. याशिवाय हिवतड येथून गोमेवाडी, करगणी ओढ्याला पाणी सोडून ओढ्यावरील बंधारे भरले आहेत. काळेवाडीतून ओढ्याला पाणी सोडून काळेवाडी, माळेवाडी, शेटफळे ओढ्यावरील दहावर बंधारे भरलेत. पारेकरवाडीत ओढ्यालाही पाणी सोडले आहे. सध्याच्या मागणीप्रमाणे १५ जून पर्यंत पाणी चालू ठेवण्याचे नियोजन आहे. अन्य ठिकाणाहून मागणी आल्यास आणि त्या भागात पाणी जात असल्यास टेंभूचे पाणी देण्याचे नियोजन केले जाणार आहे. बंद पाइपलाइन मधून दिघंची तलावात भरला आहे.

अन्य भागातील बंद पाइपलाइनची कामे सुरू झाली आहेत. लाकडाउनमुळे कामे बंद होती. तसेच सिमेंट पाइपचा अपुरा पुरवठा होत असल्यामुळे अडचणी येत आहे. ऐन उन्हाळ्यात पाणी सोडल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. द्राक्ष, डाळिंब, सीताफळ या फळ लागवडीत वाढ होत चालली आहे. टेंभूच्या पाण्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे.

टेंभूच्या पाण्याने शेटफळे ओढ्यावरील बंधारे भरून दिले. त्यामुळे डाळिंबाच्या बागा धरल्या तसेच इतर पीक आहे केली आहे. - प्रकाश गायकवाड, शेतकरी, शेटफळे, ता. आटपाडी.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Severe Water Shortage : लोकसभेच्या रणधुमाळीत सातारा जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई

Kharif Sowing : साडेसात लाख हेक्टरवर जिल्ह्यात खरिपाचा पेरा

Shaktipeeth mahamarg : 'रस्त्यांवरच्या लढाईची शेतकऱ्यांनी तयारी करावी', शक्तिपीठ विरोधात शेतकऱ्यांची एकजूठ

Agrowon Podcast : कापूस वायद्यांमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, गहू यांचे काय आहेत दर ?

Agriculture Update : विकसित केलेले वाण शेतकऱ्यांनी वापरावे : कलंत्रे

SCROLL FOR NEXT