सुत
सुत  
मुख्य बातम्या

कापड, सूत उत्पादनाचा आलेख चढताच

Chandrakant Jadhav

जळगाव ः स्वातंत्र्यप्राप्तीनंतर देशातील वस्त्रोद्योगाशी संबंधित उत्पादनांचा आलेख चढताच राहीला आहे. या उद्योगाने नजरेत भरणारी कामगिरी सतत केली असून, सर्वात मोठा उद्योग म्हणून या ओळख कायम ठेवली आहे. जगात भारतीय वस्त्रोद्योग आघाडीवर असल्याचेही जाणकारांनी सांगितले.  जागतिक वस्त्रोद्योग परिषदेने प्रसिद्ध केलेल्या स्मरणिकेनुसार स्वातंत्र्यप्राप्तीच्या वेळेस देशात दोन लाख लूम व सुमारे अडीच लाख हातमाग होते. या माध्यमातून तेव्हा वर्षाकाठी चार हजार दशलक्ष मीटर एवढ्या कापडाचे उत्पादन होत होते. तत्कालीन कापड गिरण्या किंवा वस्त्रोद्योगात सात लाख मजूर, कर्मचारी काम करायचे. रोजगार देणारा मोठा उद्योग म्हणून वस्त्रोद्योगाची तेव्हा ओळख होती.ती आजही कायम असून, शेतीनंतर सर्वाधिक २२ कोटी जणांना या उद्योगात रोजगार आहे.  देशाच्या अर्थव्यवस्थेत वस्त्रोद्योगाचा वाटाही मोठा असून, यंत्रमागांच्या संख्येत देशात वर्षागणिक वाढ झाली. १९९०-९१ मध्ये कापड उत्पादनात देशातील मिल क्षेत्राचा वाटा ११.१० टक्के होता. दोन हजार ५८९ चौरस मीटर कापड उत्पादन झाले. यंत्रमाग क्षेत्राचा वाटा ५७.२१ टक्के होता (१३ हजार ३४८ चौरस मीटर कापड उत्पादन). नंतर यंत्रमाग क्षेत्राचा देशातील कापड उत्पादनातील वाटा वाढतच गेला असून, २०१०-११ मध्ये मिल क्षेत्राचा वाटा ३.६ टक्के राहिला. तर यंत्रमाग क्षेत्राचा वाटा हा ८० टक्‍क्‍यांवर गेला. मागील सहा वर्षांतही यंत्रमागांचा कापड उत्पादनातील वाटा चांगला राहिला आहे.  वस्त्रोद्योग आयुक्तालयाच्या माहितीनुसार, १९८५ मध्ये सहा लाख ३८ हजार ७६४ यंत्रमाग होते. १९९५ मध्ये १३ लाख ६५ हजार २८४, सन २००० मध्ये १६ लाख ५६ हजार ३६७, २००६ मध्ये १९ लाख ६८ हजार ७४ आणि अलीकडे यंत्रमागांची संख्या २२ लाखांवर पोचली आहे. यंत्रमागात रोजगाराची संधीही वाढत असून, सुमारे साडेपाच कोटी जणांना रोजगार या क्षेत्रात मिळत आहे.  आशिया खंडात भारतीय वस्त्रोद्योग आघाडीवर पोचत आहे. जवळच्या बांगलादेशलाही मोठी मदत देशांतर्गत वस्त्रोद्योगाच्या धोरणाने झाली आहे.  वस्त्रोद्योगाची स्थिती                            

घटक     १९५१    १९८०  १९९६ २००७ २०११ २०१७
सूतगिरण्या १९३    ७१९ १२९४   १८२२   १९०८ २४०० 
चात्यांची संख्या (कोटींमध्ये)  ०.११    २.५७      ३.११       ४.१३    ५.००   ६.००
रोटर्सची संख्या (लाखांत)   २२८० -  २२६०२८

६५६७००० 

७३६९००० -
मागांची संख्या (लाखांत)   १.९५  १५.०८ २३.०३   २८.०३ ३२.०१ -
सूताचे उत्पादन  (कोटी किलोग्रॅममध्ये)    ५९.१  १२५.३ १८८.८       ३२३.९   ४०१.०३ ६०० 
कापड उत्पादन  (कोटी चौरस मीटरमध्ये) ३७.३६  ४७.३ १७२.१३   १४०१६ १७१२३  २०१२५ 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Orange Farmer : निवडणूक काळात संत्रा उत्पादक उपेक्षित

Chara Chavani : चारा छावण्या सुरू करण्याची पशुपालकांची मागणी

Cotton Sowing : महाराष्ट्रात कापसाचा पेरा राहणार ४२ लाख हेक्टरवर

Animal Heat Stress : वाढत्या उष्म्याचा पशुधनाला धोका

Agriculture Technology : शेती तंत्रज्ञान, पिकांबाबत शेतकरी साक्षर असणे गरजेचे

SCROLL FOR NEXT