संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
मुख्य बातम्या

पुणे जिल्ह्यासाठी दोन लाख टन खतांची मागणी

टीम अॅग्रोवन

पुणे  ः जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी रब्बी हंगामाची तयारी सुरू केली आहे. शेतकऱ्यांची गरज लक्षात घेऊन जिल्हा स्तरावरून करण्यात आलेल्या मागणीनुसार विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयातर्फे कृषी आयुक्त कार्यालयाकडे दोन लाख दोन हजार ३२१ मेट्रिक टन खताची मागणी करण्यात आली आहे. कृषी आयुक्तालयाकडून मंजुरी मिळाल्यानंतर मागणी केलेल्या खताचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

चालू वर्षी जून ते सप्टेंबर या महिन्यात पावसाने चांगली हजेरी लावली. त्यामुळे रब्बी हंगामातील पेरणीच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. जिल्ह्यात रब्बीचे सरासरी तीन लाख ९७ हजार ५०५ हेक्टर क्षेत्र आहे. चालू वर्षी पाण्याची सुविधा असलेल्या शेतकऱ्यांनी हंगामात कृषी विभागाने दोन लाख ९४ हजार ८५४ हेक्टरवर पेरणीचे नियोजन केले आहे. यामध्ये सर्वाधिक क्षेत्र रब्बी ज्वारीचे आहे. सुमारे एक लाख ८० हजार हेक्टर क्षेत्र आहे. त्यापाठोपाठ गव्हाचे ४८ हजार हेक्टर क्षेत्र आहे. हरभऱ्यांचे ४८ हजार १७० हेक्टर क्षेत्र आहे. त्यासाठी सुमारे बियाण्यांची २९ हजार ४०० क्विंटलची मागणी केली आहे. त्याचबरोबर पेरणीच्या वेळेस व पिके वाढीच्या अवस्थेत असताना खताची अडचणी येऊ नये म्हणून बियाण्यांची मागणी करण्यात येत आहे.

गेल्या वर्षी रब्बी हंगामात दोन लाख २८ हजार १८ मेट्रिक टन खताची मागणी केली होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत खतांच्या मागणीत घट केली आहे. तरी चालू वर्षी खरीप हंगामातील खते काही प्रमाणात खते शिल्लक राहण्याची शक्यता आहे. 

रब्बी हंगामात नत्र खतामध्ये युरियाची मागणी असण्याची गरज लक्षात घेऊन जिल्ह्यासाठी ८४ हजार २९० मेट्रिक टन खताची मागणी केली आहे. चालू वर्षी डीएपी १४ हजार १३१, तर म्युरेट ऑफ पोटॅश १० हजार २१०, एसएसपी १९ हजार ४५९, तर इतर खतांचा ७४ हजार २३१ मेट्रिक टन खताचा पुरवठा केला जाईल. पॉस मशिनवर नोंदणी केल्याशिवाय शेतकऱ्यांना खते मिळणार नसल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली. 

जिल्ह्यातील शेतकरी गट, शेतकरी कंपन्यांनी रासायनिक खताची मागणी कृषी विभागास केल्यानंतर त्यांनाही खतांचे थेट पुरवठा करण्याचे नियोजन कृषी विभागाने केले आहे. त्यासाठी त्यांनी तालुका कृषी अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांकडे मागणी नोंदविणे गरजेचे आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

SCROLL FOR NEXT