urea  
मुख्य बातम्या

खत मंत्रालयाच्या ‘डीबीटी’ला ‘डिजिटल इंडिया’ पुरस्कार 

खत मंत्रालयाच्या ‘डीबीटी इन फर्टिलायझर प्रोजेक्ट'ला भारत सरकारचा ‘डिजिटल इंडिया ॲवॉर्ड २०२०’ ने सन्मानित करण्यात येणार आहे.

टीम अॅग्रोवन

कोल्हापूर : खत मंत्रालयाच्या ‘डीबीटी इन फर्टिलायझर प्रोजेक्ट'ला भारत सरकारचा ‘डिजिटल इंडिया ॲवॉर्ड २०२०’ ने सन्मानित करण्यात येणार आहे. 

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आज (ता. ३०) दिल्ली येथे या प्रकल्पाचा सन्मान करण्यात येणार आहे. भारत सरकारच्या डिजिटल इंडिया अंतर्गत या पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे. राष्ट्रपतींच्या हस्ते अतिरिक्त सचिव व या प्रकल्पाचे प्रमुख मार्गदर्शक धर्मपाल हा पुरस्कार स्वीकारतील. 

भारत सरकारच्या रसायने व खते मंत्रालयाच्या वतीने रासायनिक खत वितरण डिजिटल ऑनलाइन प्रणाली विकसित केली आहे. गेल्या ५ वर्षांपासून या प्रकल्पाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. प्रकल्पात रासायनिक कंपन्या खतांचे उत्पादन करण्यापासून ते शेतकऱ्यांच्या हातात खतांचा पुरवठा करण्यापर्यंतची ऑनलाइन प्रणाली विकसित करण्यात यश आले. 

शेतकऱ्यांना आधार बायोमेट्रिक केल्यानंतर खताची पोहोच पावतीचे एसएमएस मोबाईलवर येतात, शेतकरी शासनाने ठरवून दिलेल्या किमतीत खतांची खरेदी करू शकतात. यामुळे खतांच्या काळाबाजाराला आळा बसविण्यात यश आलेले आहे. खताची खरेदी करणाऱ्या शेतकऱ्यांना खताचा साठा गावातील दुकानात किती आहे. याची माहिती एसएमएसद्वारे मिळू लागली आहे. या प्रकल्पातील नावीन्यपूर्ण उपक्रमाची दखल राष्ट्रपती भवनने घेतली आहे. 

या प्रकल्पाचा प्रमुख उद्देश शेतकऱ्यांना योग्य दरात खतांचा पुरवठा करणे, खतांचा अतिरिक्त वापर थांबविणे, गैर वापरावर नियंत्रण आणणे हा आहे. हा प्रकल्प देशातील ३० राज्यांमध्ये राबविला जात आहे.   

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Nanded Heatwave: नांदेडला १३ एप्रिलपासून तापमानाचा पारा ४० अंशांवर

Crop Insurance : सुधारित पिक विमा योजनेमुळे शेतकरी भरपाईपासून वंचित?

Mumbai Pune Missing Link Project: मुंबई- पुणे प्रवासाचा वेळ ३० मिनिटांनी कमी होणार, 'मिसिंग लिंक' खुला

Fertilizer Shop License Suspension: तीन कृषी केंद्रांचे परवाने रद्द, तर एकवीस निलंबित

India Rainfall Forecast: मे महिन्यात अधिक पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT