राज्यात वादळी पावसाला आज पोषक हवामान
राज्यात वादळी पावसाला आज पोषक हवामान 
मुख्य बातम्या

राज्यात वादळी पावसाला आज पोषक हवामान

टीम अॅग्रोवन

पुणे : राज्यात वाढलेला उन्हाचा चटका तापदायक ठरत असतानाच, पूर्व मोसमी पावसाला पोषक हवामान होत आहे. आज (ता.१६) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात वादळी पावसाची शक्यता आहे. तर उन्हाचा वाढलेला चटकाही कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. बुधवारी (ता.१५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये अकोला येथे देशातील उच्चांकी ४३.३, तर जळगाव येथे ४३.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. मध्य महाराष्ट्रातील जळगाव, धुळे, नाशिक, सोलापूर, मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड, परभणी, नांदेड, विदर्भातील अकोला, अमरावती, बुलडाणा, ब्रह्मपुरी, चंद्रपूर, नागपूर, वाशीम, वर्धा येथे तापमान चाळीशीपार गेले आहे. पुढील काळात उन्हाचा ताप आणखी वाढण्याची शक्यता आहे. मध्य प्रदेशापासून मध्य महाराष्ट्र, गोवा, अरबी समुद्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा आहे. यामुळे आजपासून (ता.१६) राज्यात तुरळक ठिकाणी जोरदार वारे, मेघगर्जना, विजांसह वादळी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने  वर्तविली आहे. बुधवारी (ता. १५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३९.१, जळगाव ४३.२, धुळे ४२.०, कोल्हापूर ३७.६, महाबळेश्‍वर ३३.३, नाशिक ४०.१, निफाड ३९.४, सांगली ३८.०, सातारा ३८.१, सोलापूर ४०.२, डहाणू ३४.२, सांताक्रूझ ३५.२, रत्नागिरी ३४.६, औरंगाबाद ४०.३, बीड ४१.५, परभणी ४१.२, नांदेड ४१.५, अकोला ४३.४, अमरावती ४२.०, बुलडाणा ४०.०, ब्रह्मपुरी ४०.४, चंद्रपूर ४१.४, गोंदिया ३९.२, नागपूर ४१.२, वाशीम ४०.०, वर्धा ४०.२.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Production : सांगलीत साखर उत्पादनात सात लाख क्विंटलने वाढ

MahaRally Meeting : धुळ्यात महारॅलीची प्रशासनाकडून जय्यत तयारी

Severe Water Shortage : लोकसभेच्या रणधुमाळीत सातारा जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई

Kharif Sowing : साडेसात लाख हेक्टरवर जिल्ह्यात खरिपाचा पेरा

Shaktipeeth mahamarg : 'रस्त्यांवरच्या लढाईची शेतकऱ्यांनी तयारी करावी', शक्तिपीठ विरोधात शेतकऱ्यांची एकजूठ

SCROLL FOR NEXT