monsoon
monsoon  
मुख्य बातम्या

मॉन्सूनसाठी तयार होतेय पोषकस्थिती...

टीम अॅग्रोवन

पुणे: बंगालच्या उपसागरात आलेल्या ‘अम्फान’ चक्रीवादळामुळे नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांना (मॉन्सून) चालना मिळाली. रविवारी (ता.१७) मॉन्सून दक्षिण अंदमान समुद्र, निकोबार बेटांवर डेरेदाखल झाला. मात्र हे चक्रीवादळ उत्तरेकडे सरकून गेल्यानंतर मॉन्सूनने कोणतीही प्रगती केली नाही. आठ दिवसांपासून मॉन्सूनच्या प्रगतीची वाटचाल ‘जैसे थे’ असली तरी, बंगालच्या उपसागरासह अरबी समुद्रातही पुढील वाटचालीस हळूहळू पोषक स्थिती तयार होत आहे.  हवामान विभागाने नुकत्याच जाहीर केलेल्या मॉन्सून आगमानाच्या नवीन वेळापत्रकानुसार नैर्ऋत्य मोसमी वारे २२ मेपर्यंत अंदमान बेटांच्या बहुतांशी भागावर दाखल होण्याची शक्यता गृहीत धरण्यात आली आहे. साधारणत: २० मे रोजी मॉन्सून अंदमान बेटांच्या दक्षिण भागात दाखल होतो. मात्र बंगालच्या उपसागरातील ‘अम्फान’ चक्रीवादळामुळे पाच दिवस आधीच मॉन्सून दक्षिण अंदमानात दाखल झाला. चक्रीवादळ उत्तरेकडे सरकून गेल्यानंतर तब्बल दिवसांत मॉन्सूनची कोणतही प्रगती झालेली नाही.  हवामान विभागाच्या पुणे वेधशाळेतील हवामान अंदाज प्रमुख डॉ. अनुपम कश्‍यपी म्हणाले की, बंगालच्या उपसागरात ‘अम्फान’ चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर फारसा प्रभाव पडला नसला तरी, विदर्भासह राज्यातील बाष्प ओढून घेतले. हवामान कोरडे होऊन विदर्भात उष्ण लाट आली आहे. नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) १७ मे रोजी दक्षिण अंदमान समुद्र, निकोबार बेटांवर मॉन्सून दाखल झाला. या भागात सर्वसाधारण वेळेच्या तीन दिवस आधीच आधीच मॉन्सूनने हजेरी लावली. चक्रीवादळाच्या प्रभावामुळे पुढील वाटचालीसाठी आवश्‍यक स्थती निर्माण झाली नाही. वादळाचा प्रभाव ओसरून पुन्हा पोषक वातावरण तयार होण्यास कालावधी लागणार आहे.  दरम्यान, यंदा केरळातील मॉन्सूनचे आगमन काहीसे लांबणार आहे. यंदा मॉन्सून चार दिवस उशीराने पाच जून रोजी केरळात पोहोचण्याचा अंदाज आहे. तसेच मॉन्सूनचे अंदमानातील आगमनाचा, केरळातील आगमन आणि देशातील पावसाच्या प्रमाणाशी कोणतही परस्पर संबध नसल्याचे हवामान विभागाने आधीच स्पष्ट केले आहे. तर ‘अम्फाम’ चक्रीवादळामुळे प्रभावित झालेले प्रवाह सुरळीत होत असल्याने लवकरच मॉन्सून अंदमान बेटांच्या आणखी काही प्रगती करणार आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Export : कांदा निर्यात खुली; मात्र अटी, शर्थींचा खोडा

Baramati Lok Sabha Election : नणंद की भावजय, कोण मारणार बाजी

Water Scarcity : नागरिकांची पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती

Sugar Industry : साखर उद्योग सौरऊर्जा निर्मितीत येणार

Summer Sowing : उन्हाळी पेरणी क्षेत्रात नऊ हजार हेक्टरने घट

SCROLL FOR NEXT