संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
मुख्य बातम्या

सातारा जिल्ह्यात ११२५ शेततळी पूर्ण

टीम अॅग्रोवन

सातारा  : मागेल त्याला शेततळे योजनेस सातारा जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातून उद्दिष्टाच्या दुप्पट म्हणजेच ४१२७ अर्ज प्राप्त झाले असून, ११२५ शेततळ्यांची कामे पूर्ण झाली आहेत; तसेच ४९ शेततळ्यांची कामे प्रगतिपथावर आहेत. सध्या सुरू असलेला पाऊस शेततळी भरण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.   

राज्य शासनाने फेब्रुवारी २०१६ मध्ये मागेल त्याला शेततळे ही योजना जाहीर केली आहे. या योजनेतून जिल्ह्यात दोन हजार शेततळ्यांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. सुरवातीच्या काळात शेतकऱ्यांकडून प्रतिसाद मिळाला नव्हता. त्यानंतर योजनेतील काही अटी शिथिल केल्यामुळे या योजनेस प्रतिसाद वाढला आहे.

दोन हजार शेततळ्यांच्या उद्दिष्टापेक्षा जास्त म्हणजे ४१२७ अर्ज प्राप्त झाले आहेत. यामध्ये ३६११ अर्ज पात्र; तर ५१३ अर्ज अपात्र ठरले असून, ४९ अर्जांच्या छाननीचे काम सुरू आहे. पात्र अर्जापैकी २६४५ अर्जांना मंजुरी देण्यात आली. २३६७ शेततळ्यांची आखणी करून दिली आहे. सध्या ८८७ शेततळ्यांचे काम सुरू असून, ११२५ शेततळ्यांची कामे पूर्ण झाली आहेत. जिल्ह्यातील सर्वच शेतकऱ्यांना या योजनेत लाभ घेता येत असल्याने या योजनेस शेतकऱ्यांकडून प्रतिसाद वाढत आहे.

तालुकानिहाय शेततळ्यांची पूर्ण झालेली कामे
सातारा  ६४
खटाव १४८
फलटण २५०
खंडाळा   ७३
जावली १२
कऱ्हाड  ५१
कोरेगाव १५९
माण   ३००
वाई ५९
महाबळेश्वर
पाटण

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Season : देशातील साखर हंगाम अंतिम टप्प्यात

Weather Update : कोकणात उन्हाचा चटका ठरणार तापदायक

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

SCROLL FOR NEXT