संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
मुख्य बातम्या

सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वाढीव दूधदराची प्रतीक्षा

टीम अॅग्रोवन

सातारा  : स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह शेतकऱ्यांनी केलेल्या दूध दरवाढीच्या आंदोलनाची दखल घेत राज्य शासनाने प्रतिलिटर पाच रुपये वाढीव दर जाहीर केला होता. मात्र, जिल्ह्यात आजही दूध संकलन केंद्राकडून जुन्याच म्हणजेच १८ ते २१ रुपये प्रतिलिटर दराने दूध खरेदी केली जात आहे. जाहीर केलेला दर कधीपासून मिळणार याबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आहे.  

सातारा जिल्ह्यात दिवसातील दोन वेळचे एकूण २० लाख लिटर गाईचे दुधाचे विविध संस्थांकडून संकलन होते. दूध दर घसरल्याने शेतकरी अडचणीत आले असल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले होते.

या आंदोलनास दूध उत्पादक शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला होता. आंदोलनाच्या काळात नगण्य दूध संकलन होत होते. या आंदोलनाची दखल घेत राज्य शासनाने गाईच्या दुधास प्रतिलिटर २५ रुपये दर जाहीर केला होता. मात्र, या जाहीर केलेल्या दराने जिल्ह्यात दूध खरेदी केली जात नसून राज्य शासनाची दर वाढ फसवी ठरत असल्याचे शेतकरी सांगत आहेत.

सध्या जिल्ह्यात जुनाच म्हणजे प्रतिलिटर १८ ते २१ रुपये दर गायीच्या दुधाला दिला जात आहे. यामुळे शेतकऱ्यांना अार्थिक तोटा सहन करावा लागत आहे. काही संस्थांकडून एक आॅगस्टपासून सुरू होणाऱ्या संकलनास नवीन दर मिळणार असल्याचे सांगतिले जात आहे. एकुणच दुधाला दर किती व कधी मिळणार, याविषयी शेतकऱ्यांत संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Production : सांगलीत साखर उत्पादनात सात लाख क्विंटलने वाढ

MahaRally Meeting : धुळ्यात महारॅलीची प्रशासनाकडून जय्यत तयारी

Severe Water Shortage : लोकसभेच्या रणधुमाळीत सातारा जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई

Kharif Sowing : साडेसात लाख हेक्टरवर जिल्ह्यात खरिपाचा पेरा

Shaktipeeth mahamarg : 'रस्त्यांवरच्या लढाईची शेतकऱ्यांनी तयारी करावी', शक्तिपीठ विरोधात शेतकऱ्यांची एकजूठ

SCROLL FOR NEXT