bardana
bardana  
मुख्य बातम्या

बारदान्याच्या ६५ कोटींची शेतकऱ्यांना प्रतिक्षा 

टीम अॅग्रोवन

भंडारा: गेल्या खरीप व रब्बी हंगामात स्वतःचा बारदाना देऊन शेतकऱ्यांनी धान विक्री केली. त्यापोटी प्रति नग २० रुपये ८६ पैसे शेतकऱ्यांना मिळणे अपेक्षित होते. यासाठी ६४ कोटी ८५ लाख ७५ हजार ८४ रुपयांचा निधी मिळाला. मात्र त्याचे वाटप हेतुपुरस्सर केले जात नसल्याचा आरोप सडक अर्जुनी बाजार समितीचे संचालक रोशन बडोले यांनी केला आहे. 

अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या वतीने २७ ऑक्टोबरला आदेश काढण्यात आले. त्यानुसार, शेतकऱ्यांनी धान विक्रीच्या वेळी आपला बारदाना दिला असेल तर त्याची रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात यावी, असे निर्देश आहेत. आदिवासी विकास महामंडळ देवरी अंतर्गत सन २०१९-२० या हंगामात २८ केंद्रावर धान खरेदी करण्यात आली. नवेगाव बांध अंतर्गत १६ केंद्रावर १८६३७ व बिगर आदिवासी शेतकरी २८८८२ तर देवळी क्षेत्रातील ३४१० शेतकऱ्यांनी आधारभूत केंद्रावर आपल्या धानाची विक्री केली. दोन्ही कार्यालयांमार्फत १३ कोटी २३ लाख ३० हजार ३३ रुपयांचे धान खरेदी करण्यात आले. 

या हंगामासाठी बालाजी कार्पोरेशन (गोंदिया) व शुभलक्ष्मी राइस इंडस्ट्रीज (गोंदिया) यांनी महामंडळा सोबत एकदा वापरलेला ५० किलो वजनाचा बारदाना पुरवठा करण्याबाबत करारनामा केला होता. परंतु बालाजी कार्पोरेशन यांना रब्बी हंगामातील ८ मे रोजी महामंडळाने पुरवठा आदेश दिला. २७ ऑगस्टपर्यंत मुदत असताना देखील बारदाना पुरवठा करण्यात आला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांकडून एकदा वापरलेला ११ कोटी ६३ लाख १२९ बारदाना जमा झाला. यासाठीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा व्हावी त्याकरिता निधी मिळावा, अशा मागणीचा प्रस्ताव आदिवासी विकास महामंडळ भंडाराच्या वतीने शासनाला देण्यात आला होता.  शेतकऱ्यांची दिशाभूल  महामंडळाचे व्यवस्थापक यांनी १५ जुलै २०२० रोजी ६४ कोटी ८४ लाख ७५ हजार ५८४ रुपयांचा निधी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाल्याचे सांगितले. मात्र अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा झाली नाही. दिशाभूल थांबवीत शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम त्वरित जमा करावी, अशी मागणी रोशन बडोले यांनी केली आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

SCROLL FOR NEXT