Onion
Onion  
मुख्य बातम्या

कांद्याचे दर घसरल्याने शेतकरी अडचणीत 

मुकुंद पिंगळे

नाशिक : जिल्ह्यात बाजारात खरीप हंगामातील नवीन लाल कांद्यासह उन्हाळ कांद्याची आवक होत आहे. कांद्याला गेल्या तीन दिवसांपूर्वी सरासरी तीन हजार रुपये दर मिळत असताना शुक्रवारी (ता. २६) एक हजार रुपयांपर्यंत घसरण झाली. कांद्याची वाढत असलेली आवक व अवकाळीमुळे घटलेली प्रतवारी यामुळे दरात घसरण झाल्याचे बोलले जात आहे. मात्र चालू वर्षी घटलेले उत्पादन व वाढलेल्या उत्पादन खर्चामुळे शेतकऱ्यांसमोर अडचणी वाढल्या आहेत. 

खरीप हंगामातील कांदा लागवडी खराब झाल्याने जिल्ह्यात अपेक्षित आवक होत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे मागणीच्या तुलनेत आवक नसल्याने दरात सुधारणा झाली होती. त्यातच गत सप्ताहात उन्हाळ कांद्याची आवक सुरू झाल्याने काही प्रमाणात आवक वाढली. मात्र ती नियमित अवकेच्या तुलनेत कमीच आहे. असे असताना दर तीन हजारांवर स्थिरावले होते. मात्र शुक्रवारी (ता.२६) लासलगाव बाजारात उन्हाळ कांद्यासाठी सरासरी दरामागे १०००, तर लाल कांद्यामागे ९५० रुपयांनी घसरण झाली आहे. पिंपळगाव बाजार आवारात सर्वांत उचांकी भाव होता. मात्र येथेही हीच परिस्थिती आहे. 

सध्या शेजारील गुजरात राज्यातील भावनगर, महुवा, गोंडल या भागांतून आवक वाढली आहे. त्यामुळे या भागातून देशभर लाल व सफेद कांदा पुरवठा होत आहे. पश्‍चिम बंगालमधील सुखसागर भागातून कांदा पीक काढणीस आले आहे. यासह राज्यात नाशिकसह नगर व पुणे जिल्ह्यांतून आवक होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे येथील स्थानिक बाजारात कांदा उपलब्ध होत आहे. परिणामी, जिल्ह्यातील कांद्याची मागणी कमी होत असल्याचे कांदा व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.  उत्पादन खर्च वाढला  चालू वर्षी वाढलेले बियाण्यांचे दर, पुनर्लागावड खर्च, अतिवृष्टी व हवामान बदलामुळे अतिरिक्त पीक संरक्षण यामुळे एकरी खर्चात २० हजारांनी वाढ झाली. त्यामुळे निघणारे उत्पादन व मिळणारे दर यांचे गणित व्यस्त असल्याने कांदा उत्पादक अडचणीत सापडले आहेत. त्यातच हे दर कमी होत असल्याने शेतकरी हतबलता व्यक्त करीत आहेत.  जिल्ह्यातील सरासरी कांदा दराची स्थिती (रुपये/क्विंटल) (उन्हाळ/लाल) 

बाजार समिती २४ फेब्रुवारी २५ फेब्रुवारी २६ फेब्रुवारी झालेली घसरण 
लासलगाव २८००/३२०० २३५१/२६०० १८००/२३५० १०००/९५० 
पिंपळगाव बसवंत ३६०१/३००१ २९०१/२६०० २१००/२४५१ १५००/५५० 
मनमाड -/३२०० -/२४५० -/२१०० -/११०० 
चांदवड ३०००/३२५० २५५०/२७०० २०००/२३०० १०००/९५० 

प्रतिक्रिया  सध्या बाजारात कांद्याची आवक वाढती आहे. गुजरातमध्ये सुरुवातीला आवक मर्यादित असल्याने पुरवठा मर्यादित होता. हा कांदा देशभर जाऊ लागला आहे. बाहेरील घाऊक व्यापाऱ्यांची मागणी कमी झाल्याने सध्या दरावर परिणाम झाला.  -मनोज जैन, कांदा व्यापारी व निर्यातदार, लासलगाव, जि. नाशिक  --------  अतिवृष्टीमुळे कांदा लागवडी खराब झाल्याने लाल कांद्याच्या उत्पादनावर परिणाम झालेला आहे. यासह नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळे कांद्याचे नुकसान वाढले आहे. त्यामुळे प्रतवारीवर परिणाम होण्यासह आवक वाढल्याने दरात घसरण झाली आहे.  - नरेंद्र वाढवणे, सचिव, लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Animal Care : वाढत्या तापमानात जनावरांचे व्यवस्थापन

Lok Sabha Elections : चुरशीने मतदान; सकाळी ९ पर्यंत कोल्हापूर ८.०४ टक्के तर हातकणंगले ७.५५ टक्के मतदानाची नोंद

Fish Farming : पुनर्वसनग्रस्ताला मिळाला मत्सशेतीतून मोठा आधार

Turmeric Farming : हळदीची वाढली उत्पादकता

Farmer As Life Partner : आदर्शवत विवाहसोहळा

SCROLL FOR NEXT