kapus
kapus 
मुख्य बातम्या

परभणीत कापूस खरेदी ठप्प, शेतकऱ्यांची कोंडी 

टीम अॅग्रोवन

परभणी ः राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघ, भारतीय कापूस महामंडळ (सीसीआय) तसेच खाजगी व्यापाऱ्यांची कापूस खरेदी गेल्या २५ दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा सुमारे सात लाख क्विंटल कापूस घरातच पडून आहे. त्यातच तापमानवाढीमुळे कापसाच्या दर्जावर परिणाम होत असून खरेदी बंद असल्यामुळे शेतकऱ्यांची कोंडी होत आहे.  जिल्ह्यातील तापमानात ४० अंश सेल्सिअसपर्यंत वाढ झाली आहे. या परिस्थितीत घरात कापूस ठेवणे अत्यंत धोकादायक झाले आहे. खरिपाच्या पेरणीसाठी निविष्ठांची तजवीज करण्यासाठी पैशाची गरज आहे. कापूस उत्पादकांना आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी तत्काळ कापूस खरेदी सुरु करण्याची गरज आहे.  शेतकऱ्यांनी पणन महासंघ आणि सीसीआयकडे मोठ्या प्रमाणावर कापूस घातला. परंतु कधी रुईच्या गाठी तसेच सरकी साठविण्यासाठी जागा नसल्यामुळे तर कधी ग्रेडर नसल्यामुळे तर अनेकदा ढगाळ वातावरण, बिगर मोसमी पाऊस आदी कारणांनी पणन महासंघ तसेच सीसीआयची कापूस खरेदी बंद राहिली. त्यात दरात खुल्या बाजारातील दरात सुधारणा न झाल्यामुळे फेब्रुवारी-मार्च महिन्यात पणन महासंघ आणि सीसीआयच्या खरेदी केंद्रांवर वाहनांच्या रांगा लागल्या.  खरेदी केंद्रांवर मोजमापास विलंब लागला त्यामुळे शेतकऱ्यांच्या माथी वाहन भाड्याचा भुर्दंड बसला. लॅाकडाऊनमुळे पणन महासंघ, सीसीआय तसेच परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीतील खाजगी कापूस खरेदी २२ मार्च पासून बंद आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आवश्यक सोशल डिस्टींग राखणे शक्य नसल्यामुळे पणन महासंघाची कापूस खरेदी सुरु करणे शक्य नाही, असे नुकतेच जाहीर करण्यात आले. सीसीआयकडून तसेच खासगी कापूस खरेदी सुरु करण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे नियोजन दिसत नाहीत. त्यामुळे विक्री व्यवस्थेअभावी अभावी कापूस घरात पडून असल्यामुळे रब्बी हंगामातील शेतमाल साठविण्यासाठी अडचणी येत आहेत. गेल्या आठवड्यापासून तापमानात वाढ होत आहे. त्यामुळे घरात कापूस साठवून ठेवण्यामध्ये जोखीम आहे.  परभणी जिल्ह्यात शुक्रवारपर्यंत (ता.२०) पणन महासंघाची ४ लाख ७८ हजार ६६५ क्विंटल, सीसीआयची ८ लाख ८८ हजार ४९२ क्विंटल, खाजगी व्यापाऱ्यांकडून ५ लाख ९३ हजार ९८३ क्विंटल अशी एकूण १९ लाख ६१ हजार १४० क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली. 

सात लाख क्विंटल कापूस शेतकऱ्यांच्या घरात  सुरुवातीला नव्हती परंतु गर्दी वाढल्यामुळे अखेरच्या टप्प्यात पणन महासंघाच्या खरेदी केंद्रावर कापूस विक्रीसाठी शेतकऱ्यांना नोंदणी करावी लागत आहे.परभणी,गंगाखेड, पाथरी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील मिळून सहा हजार शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. लॅाकडाऊनमुळे नोंदणी बंद आहे. अन्य ठिकाणच्या बाजार समित्यांत नोंदणी सुरु नाही. परभणी तालुक्यात १ लाख ४० हजार क्विंटल  कापूस शेतकऱ्यांच्या घरात आहे. जिंतूर, सेलू, मानवत, पाथरी, सोनपेठ, गंगाखेड, पालम, पूर्णा आदी तालुक्यातील मिळून सुमारे सात लाख क्विंटल कापूस शेतकऱ्यांच्या घरात पडून आहे.  प्रतिक्रिया कापूस विक्रीसाठी तीन बाजार समित्यांअंतर्गत शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. सरकी साठविण्यासाठी जागा कमी पडत आहे. हमाल-कामगारांचा प्रश्न आहे. मे महिन्यात पूर्व मोसमी पाऊस सुरु राहिल्यास खरेदीत अडथळे येऊ शकतात.  - ए. डी. रेनके, विभागीय व्यवस्थापक, पणन महासंघ, परभणी   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cow Market : आळेफाट्याच्या बाजारात १६५ गायींची विक्री

Urea Racket : युरिया रॅकेटविरोधात अखेर गुन्हा दाखल

Jowar Market : हमीभावापेक्षा कमी दराने विकतेय ज्वारी

Bhavantar Yojana : भावांतर योजनेचे गाजर

Tur Market : विदर्भातील बहुतांश बाजारांत तूरदर दबावात

SCROLL FOR NEXT