‘किसान गणतंत्र परेड’साठी शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर सजले Farmers' tractors decorated for 'Kisan Ganatantra Parade'
‘किसान गणतंत्र परेड’साठी शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर सजले Farmers' tractors decorated for 'Kisan Ganatantra Parade' 
मुख्य बातम्या

‘किसान गणतंत्र परेड’साठी शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर सजले

टीम अॅग्रोवन

नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनानिमित्त राजधानी दिल्लीत मुख्य परेड नंतर होणाऱ्या शेतकऱ्यांच्या ‘किसान गणतंत्र परेड’ची जय्यत तयारी झाली आहे. उत्तर प्रदेश-दिल्लीच्या सीमेवरील गाजीपूर आणि दिल्ली हरियानाच्या सीमेवरील टिकरी येथे शेतकरी ट्रॅक्टर परेडसाठी सज्ज झाले आहेत.

उत्तर प्रदेशमधून गाजीपूर येथे, तर पंजाब, हरियानामधून टिकरी येथे मोठ्या संख्येने टॅक्टर जमा झाले आहेत. परेडमध्ये सहभागी होणारे ट्रॅक्टर सजविण्यात आले आहेत. अनेक ट्रॅक्टरवर शेती आणि शेतकरी संबंधी देखावे तयार करण्यात आले आहेत. 

दिल्ली पोलिसांनी मुख्य परेड झाल्यानंतर ट्रॅक्टरची रॅली काढण्यास परवानगी दिल्यानंतर शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी ट्रॅक्टर रॅलीला ‘किसान गणतंत्र परेड,’ असे नाव दिले आहे. 

किसान मजदूर संघर्ष समितीचे सुखबीर सिंग सबहरा म्हणाले, ‘‘आम्हाला ट्रॅक्टर रॅली काढण्यास दिलेली परवानगी चुकीची आहे. आम्हाला जुन्या रिंग रोडवरून रॅली काढायची होती. मात्र पोलिसांनी नव्या रिंग रोडवरून रॅली काढण्याची परवानगी दिली आहे. नव्या रिंग रोडचा मार्ग बहुतेककरुन हरियानाच्या हद्दीत येतो.

आम्ही या बाबत दिल्ली पोलिसांबरोबर आज पुन्हा चर्चा करणार आहोत. त्यानंतर ट्रॅक्टर रॅलीच्या मार्गाबाबत अंतिम निर्णय घेऊ.  या बाबत दिल्ली पोलिसांच्या गुप्तहेर विभागाचे स्पेशल कमिशनर दीपेंद्र पाठक म्हणाले, ‘‘

शेतकऱ्यांनी दिल्लीच्या आउटर रिंग रोडवर रॅली काढण्याची परवानगी मागितली होती. मात्र, तो मार्ग सोडून तीन वेगवेगळ्या मार्गावर रॅली काढण्याचा प्रस्ताव आम्ही दिला आहे. हे तीनही मार्ग दिल्लीच्या सीमेवरील आहेत. ट्रॅक्टर रॅली गाजीपूर, टिकरी, सिंघु सीमेवरून दिल्लीत प्रवेश करेल आणि पुन्हा त्याच ठिकाणी माघारी जाईल.’’ 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Orange Farmer : निवडणूक काळात संत्रा उत्पादक उपेक्षित

Chara Chavani : चारा छावण्या सुरू करण्याची पशुपालकांची मागणी

Cotton Sowing : महाराष्ट्रात कापसाचा पेरा राहणार ४२ लाख हेक्टरवर

Animal Heat Stress : वाढत्या उष्म्याचा पशुधनाला धोका

Agriculture Technology : शेती तंत्रज्ञान, पिकांबाबत शेतकरी साक्षर असणे गरजेचे

SCROLL FOR NEXT