शेतकऱ्यांचा नामपूर येथे रास्ता रोको
शेतकऱ्यांचा नामपूर येथे रास्ता रोको 
मुख्य बातम्या

शेतकऱ्यांचा नामपूर येथे रास्ता रोको

टीम अॅग्रोवन

नाशिक  : केंद्र सरकार वर्षानुवर्षे शेतकऱ्यांवर अन्याय करत आहे. ज्या वेळेस शेतकऱ्यांच्या शेतमालाचे दर कोसळतात, त्या वेळेस दुर्लक्ष केले जाते. अशा अडचणीच्या परिस्थितीत शेतकऱ्यांना मदत करण्याची मानसिकता कुणीही दाखवत नाही. मात्र, दर वाढल्यास शेतकऱ्यांच्या हातापायामध्ये बेड्या घालून कारस्थान ताबडतोब होते, असा आरोप करीत केंद्राने शेतकऱ्यांच्या भावनांशी आता खेळू नये, अशी भूमिका सटाणा तालुक्यातील संतप्त शेतकऱ्यांनी नामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वारासमोर एकत्र जमून मंगळवारी (ता. ३) तासभर रास्ता रोको करत रोष व्यक्त केला. या वेळी संतप्त शेतकऱ्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली. सध्या मका या शेतमालाचे कोसळलेले दर आणि शासकीय हमीभाव यात मोठी तफावत आहे. मक्याचा हमीभाव १७४० रुपये प्रतिक्विंटल असताना यापेक्षाही खालचे दर मिळत आहेत. त्यात म्यानमार या देशातून भारतात मोठ्या प्रमाणावर मका आयात होत आहे. ही आयात बंद करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केंद्र व राज्य सरकारला केली आहे.  शेतकऱ्याला जगविण्यासाठी आणि नवीन पिढी शेतीत राबण्यासाठी मागण्यांचा मान ठेऊन शेतकऱ्यांच्या मागण्या विचारात घेतल्या पाहिजे, असे निवेदनात म्हटले आहे. जर मागण्या विचारात घेतल्या नाही तर अजून तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. या वेळी मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार श्री. नेरकर पोलिस व निरीक्षक स्वप्नील कोळी यांना देण्यात आले. तालुक्यातील नामपूर, अंबासन, उत्राणे, द्याने यासह मोसम खोऱ्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या दिलेल्या निवेदनावर रयत क्रांती संघटनेचे दीपक पगार यांसह शेतकरी प्रवीण आहिरे, अविनाश सावंत, भाऊसाहेब कांदळकर, प्रवीण सावंत, सम्राट काकडे, हेमंत कोर, अण्णा मोरे आदींचा उल्लेख आहे.  प्रमुख मागण्या 

  • म्यानमारमधून होणारी मक्याची आयात थांबवावी. 
  • राज्य सरकारने नाशिक जिल्ह्यात मका हमीभाव केंद्रे सुरू करावीत.
  • कांदा निर्यात तातडीने सुरू करा.
  • कांदा निर्यातमूल्य कायम शून्य ठेऊन पुढील काळात कोणतेही निर्बंध आणू नयेत.  
  • जेव्हा आमचा कांदा मातीमोल भावात विकला जातो, त्या वेळी सरकार काहीच निर्णय घेऊन दिलासा देत नाही. मात्र, दरवाढ झाल्याने सरकार आडवे केंद्र सरकार आडवे येऊन दर पाडण्यास पुढाकार घेतात. सरकारने अशी कृती करू नये. - दीपक पगार, रयत क्रांती संघटना

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Crop Damage : एप्रिलमध्ये पिकांचे २७ कोटींचे नुकसान

    Agriculture Irrigation : आक्रोश मोर्चाचे रूपांतर उपोषणात

    Cotton Cultivation : सरासरीच्या तुलनेत यंदा कपाशीची लागवड वाढणार

    Book Review : ऋग्वेदाच्या पौराणिक अन् वैज्ञानिक स्पष्टीकरणाचा प्रयत्न

    Drought Monitoring : दुष्काळ पाहणी पथकांचा सोपस्कार

    SCROLL FOR NEXT