Farmers sit in Parbhani for crop insurance compensation 
मुख्य बातम्या

परभणीत पीकविमा भरपाईसाठी शेतकऱ्यांचा ठिय्या

परभणी : जिल्ह्यातील पीक विमाधारक शेतकऱ्यांना पीक कापणी प्रयोगावर आधारित तसेच स्थानिक नैसर्गिक आपत्तीअंतर्गत प्रलंबित पीकविमा भरपाई देण्याच्या मागणीसाठी विविध पक्ष, संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसह शेतकऱ्यांनी सोमवारी (ता. ७) जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन केले.

टीम अॅग्रोवन

परभणी :  जिल्ह्यातील पीक विमाधारक शेतकऱ्यांना पीक कापणी प्रयोगावर आधारित तसेच स्थानिक नैसर्गिक आपत्तीअंतर्गत प्रलंबित पीकविमा भरपाई देण्याच्या मागणीसाठी विविध पक्ष, संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसह शेतकऱ्यांनी सोमवारी (ता. ७) जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन केले.

जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी स्थानिक आपत्ती अंतर्गत पीक विमा भरपाई साठी ऑनलाइन तसेच ऑफलाइन तक्रारी केलेल्या आहेत. उत्पादनात घट आल्याबद्दल पीक कापणी प्रयोगावर आधारित विमाभरपाई तत्काळ करणे अपेक्षित आहे. परंतु, विमा कंपनीकडून त्यासाठी टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांतून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

प्रलंबित विमा भरपाई देण्याच्या मागणीसाठी शेतकरी संघटनेचे माऊली कदम, विश्वंभर गोरवे, भाजप किसान मोर्चाचे विलास बाबर, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संतोष देशमुख आदींसह शेतकऱ्यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात ठिय्या मांडला.जिल्हा कृषी उपसंचालक बी. एस. कच्छवे यांनी शेतकरी तसेच विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Solapur Water Storage: सोलापूर जिल्ह्यातील तलावांत ठणठणाट; रब्बीची चिंता वाढली

Farmers Protest: कृषिमंत्र्यांचा ताफा अडविण्याचा प्रयत्न

Raiwat Fad Weir: रायवट फड लाभक्षेत्राला पर्यायी पाण्याची मागणी

Umed Mall: सांगली जिल्ह्यास ‘उमेद मॉल’ मंजूर

Women Farmer Certificate: प्रत्यक्ष शेतीकामे करणाऱ्या महिलांना ‘शेतकरी प्रमाणपत्र’

SCROLL FOR NEXT