मानोरो येथे खोत यांच्या वाहनाला काळे झेंडे दाखवताना अांदोलक
मानोरो येथे खोत यांच्या वाहनाला काळे झेंडे दाखवताना अांदोलक 
मुख्य बातम्या

सदाभाऊंना मानोऱ्यातही दाखवले काळे झेंडे

टीम अॅग्रोवन

वाशीम : कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्याबाबत सोलापूरमध्ये झालेल्या प्रकाराची पुनरावृत्ती मंगळवारी (ता. 27) वाशीम जिल्हा दौऱ्यातही बघायला मिळाली. त्यांची वाहने मानोरा शहरातून जात असताना शेतकरी व काही कार्यकर्त्यांनी त्यांना काळे झेंडे दाखवून घोषणाबाजी केली.

स्वाभिमानी शेतकरी संघटना व कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती संघटनेतील कलगीतुऱ्याचे पडसाद विदर्भातही उमटले. मानोरा येथे काही शेतकऱ्यांनी खोत यांच्या वाहनाच्या ताफ्यासमोर येत काळे झेंडे फडकावून घोषणा दिल्या. कृषी राज्यमंत्री खोत हे मंगळवारी वाशीम जिल्हा दौऱ्यावर आले होते. योगगुरू रामदेवबाबा यांच्या उपस्थितीत कारंजा येथे अायोजित शेतकरी मेळाव्यानिमित्त त्यांचा दौरा होता. तत्पूर्वी त्यांनी मानोरा येथे भेट दिली. मानोरा येथील शिवाजी चौकात राज्यमंत्री खोत यांचा वाहनाचा ताफा आला असता शेतकरी कार्यकर्त्यांनी त्यांना काळे झेंडे दाखवून निषेध करीत घोषणा दिल्या.

स्वाभिमानीचे कार्यकते नजरकैदेत -- सोलापूर जिल्हा दौऱ्यावर असताना सदाभाऊ खोत यांच्या गाडीवर दगडफेक करून, गाजर दाखवण्यात अाले होते. त्यानंतर स्वाभिमानी व रयत क्रांती संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये थेट वाद उफाळून अाला. या घटनेचे पडसाद पाहता खोत यांच्या वाशीम दौऱ्यात पोलिसांनी अाधीच खबरदारी घेतली होती. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दामोदर इंगोले यांच्यासह कार्यकर्त्यांना मंगळवारी सकाळीच मालेगाव पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांना पोलिस ठाण्याच्या आवारात नजर कैदेत ठेवण्यात आले होते. मानोरा येथे शेतकऱ्यांनी काळे झेंडे दाखवल्याचा दावा इंगोले यांनी केला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Book Review : ऋग्वेदाच्या पौराणिक अन् वैज्ञानिक स्पष्टीकरणाचा प्रयत्न

Drought Monitoring : दुष्काळ पाहणी पथकांचा सोपस्कार

Interview with Dashrath Tambale, Director of Atma : सेंद्रिय किंवा नैसर्गिक शेतीची सक्ती नाहीच...

Rural Story : जागरण

Sugarcane Management : खोडवा उसाचे व्यवस्थापन

SCROLL FOR NEXT