शेतकऱ्यांनी सामूहिक पद्धतीने शेतीची कास धरावी ः सुभाष नागरे
शेतकऱ्यांनी सामूहिक पद्धतीने शेतीची कास धरावी ः सुभाष नागरे 
मुख्य बातम्या

शेतकऱ्यांनी सामूहिक पद्धतीने शेतीची कास धरावी ः सुभाष नागरे

टीम अॅग्रोवन

अकोला  ः सध्याच्या काळात शेतकऱ्यांनी शेती करताना सामूहिक प्रयत्नांना बळ द्यावे. त्याच पद्धतीने शेतीची कास धरावी, असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक सुभाष नागरे यांनी केले.  ते मूर्तिजापूर तालुक्यातील कार्ली येथे आयोजित शेती शाळेत बोलत होते. कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) आणि कृषी विभागाच्या वतीने आत्मा प्रकल्प संचालक मोहन वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली कार्ली येथे हरभरा पिकाच्या शेतीशाळेचे पाचवे सत्र घेण्यात आले. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून  श्री. नागरे, तालुका कृषी अधिकारी अमृता काळे, आत्माचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक व्ही. एम. शेगोकार, मंडळ कृषी अधिकारी प्रशांत पाटील, सुहास बेंडे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. या वेळी शेतीशाळेमधील शेतकऱ्यांना नागरे यांनी हरभरा पिकाच्या विविध सुधारित वाणाविषयी माहिती दिली. त्याच प्रमाणे हरभऱ्यावर प्रक्रिया करून गटाद्वारे विक्री करावी. तसेच उन्हाळी मूग लागवड करिता प्रोत्साहित करून उत्पन्न व फायदे याविषयी मार्गदर्शन केले.  श्री. शेगोकार रब्बी हंगामातील हरभरा पिकाचे एकात्मिक पद्धतीने कीड व रोग व्यवस्थापन, घाटेअळीचे नियंत्रण याविषयी तांत्रिक माहिती देऊन त्याचे महत्त्व शेतीशाळेमधील शेतकऱ्यांना पटवून दिले. सुहास बेंडे हरभरा पिकाच्या उत्पादन  वाढीविषयी मार्गदर्शन केले. कृषी विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध योजनाविषयी माहिती दिली. शेतीशाळेचे संचालन  करीत व्ही.एम.शेगोकार यांनी आभार मानले.  शेतीशाळा यशस्वी होण्यासाठी आत्माचे सहायक तंत्रज्ञान व्यवस्थापक संदीप गवई, कृषी सहायक आर. आर. भोजने, कृषी मित्र गोपाल निघोट यांनी पुढाकार घेतला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

SCROLL FOR NEXT