मुख्य बातम्या

पशुपालकांनी केली पुरस्कार वापसी

टीम अॅग्रोवन

अमरावती : पशुवैद्यकीय अधिकारी मुख्यालयी राहत नसल्याने आजारी जनावरांवर उपचार होत नाही. यामुळे जनावरे दगावल्याचा आरोप करीत आठ पशुपालकांनी त्यांना उत्कृष्ट पशुपालनासाठी मिळालेले पुरस्कार परत केले.

चांदूर बाजार येथील पंकज ऊर्फ गुड्डू मिश्रा यांच्याद्वारे देशी गोवंशाचे व्यवस्थापन होते. गेल्या दहा वर्षांपासून त्यांचे या व्यवसायात सातत्य असून जनावरांच्या उत्कृष्ट व्यवस्थापनासाठी त्यांना अनेक स्पर्धांमध्ये गौरविण्यात आले आहे. परंतु स्थानिक पशुसंवर्धन अधिकाऱ्यांच्या असहकार्यामुळे शेती उपयोगी जोडधंद्याला खीळ बसत असल्याचा आरोप गुड्डू मिश्रा यांनी केला आहे. पशुसंवर्धन अधिकारी शासनाकडून घरभाडे भत्ता घेतात, मात्र नियुक्‍ती असलेल्या गावात राहत नाही. याचा फटका गुड्डू मिश्रा यांच्यासह अनेक पशुपालकांना बसला.  

याविरोधात आठ पशुपालकांनी त्यांना मिळालेले पुरस्कार मंगळवारी (ता. २०) परत केले. सुरवातीला अमरावती विभागीय आयुक्‍त पीयूष सिंह यांच्याकडे ते पुरस्कार घेऊन गेले. परंतु आपल्या कार्यकक्षेत हे येत नसल्याचे सांगत या पशुपालकांना जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे जाण्याचा सल्ला विभागीय आयुक्‍तांनी दिला. त्यानुसार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अहमद यांच्याकडे हे पशुपालक गेले.

श्री. अहमद यांनी जिल्हा परिषदेचे पशुसंवर्धन अधिकारी डॉ. राहाटे यांना बोलावले. परंतु पशुवैद्यकीय अधिकारी मुख्यालयी राहत नसल्याची बाब मानण्यास डॉ. रहाटे तयार नसल्याने यावेळी चांगलाच वाद झाला. अखेरीस पशुपालकांनी तेथेच पुरस्कार व त्यांना मिळालेले बक्षिसाचे ७० हजार रुपयांच्या रकमेचे धनादेश ठेवले आणि कक्ष सोडला.

यांनी केली पुरस्कार वापसी पंकज मिश्रा, कांताप्रसाद मिश्रा, सोनिया मिश्रा, इमरान खान मुर्तजा खान, जीवन देशमुख, योगेश देशमुख, मनीष गणेशपुरे, नरेंद्र निर्मळ यांचा पुरस्कार परत करणाऱ्यांमध्ये समावेश आहे. दरम्यान पशुपालकांनी वाद घातल्याचा आरोप करीत पशुसंवर्धन अधिकारी डॉ. रहाटे यांनी पोलिसांत तक्रार दिल्याचे वृत्त आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Animal Care : वाढत्या तापमानात जनावरांचे व्यवस्थापन

Lok Sabha Elections : चुरशीने मतदान; सकाळी ९ पर्यंत कोल्हापूर ८.०४ टक्के तर हातकणंगले ७.५५ टक्के मतदानाची नोंद

Fish Farming : पुनर्वसनग्रस्ताला मिळाला मत्सशेतीतून मोठा आधार

Turmeric Farming : हळदीची वाढली उत्पादकता

Farmer As Life Partner : आदर्शवत विवाहसोहळा

SCROLL FOR NEXT