Farmers of 'Pokra' Take advantage: Bhumre
Farmers of 'Pokra' Take advantage: Bhumre 
मुख्य बातम्या

शेतकऱ्यांनी ‘पोकरा’चा लाभ घ्यावा ः भुमरे

टीम अॅग्रोवन

जायकवाडी, जि. औरंगाबाद: ‘‘शेतकऱ्यांनी ‘पोकरा’योजनेअंतर्गत जास्तीत जास्त लाभ घेऊन शेतीमधून भरघोस उत्पादन काढावे,’’ असा सल्ला रोहयो व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांनी दिला.

पैठण तालुक्यातील  मुधलवाडी येथे पोकरा योजनेअंतर्गत असलेल्या शेडनेट व त्यामधील पिकांची पाहणी रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे, कृषी सचिव एकनाथ डवले यांनी केली. सरपंच मुक्ताबाई लबडे, प्रकाश लबडे, शिवसेना तालुका प्रमुख आण्णाभाऊ लबडे, सतिश लबडे, खासगी सचिव  शिरसे, विभागीय कृषी सहसंचालक डॉ. दिनकर जाधव, उपविभागीय अधिकारी अनिलकुमार हदगावकर, डॉ. भगवान कापसे, डॉ. एम. बी. पाटील, डॉ. संजय पाटील, अंकुश बोबडे, विलास दहिहंडे, सोमनाथ जाधव, साईनाथ सोलाट, मुनाफ शेख, राम भोजने, गणेश दिलवाले, कृषी पर्यवेक्षक वसंत कातबने, कृषी सहायक मनिषा पवार उपस्थित होत्या.

लाभार्थी शेतकरी वच्छलाबाई जाधव व भाऊसाहेब जाधव यांचा भुमरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. पवार यांचा डवले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या वेळी पंचक्रोशीतील शेतकरी शिवाजी जाधव, लाला जाधव, सुभाष जाधव, दिलीप गोटे, अनिल जाधव आदी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage : एप्रिलमध्ये पिकांचे २७ कोटींचे नुकसान

Agriculture Irrigation : आक्रोश मोर्चाचे रूपांतर उपोषणात

Cotton Cultivation : सरासरीच्या तुलनेत यंदा कपाशीची लागवड वाढणार

Book Review : ऋग्वेदाच्या पौराणिक अन् वैज्ञानिक स्पष्टीकरणाचा प्रयत्न

Drought Monitoring : दुष्काळ पाहणी पथकांचा सोपस्कार

SCROLL FOR NEXT