farmers agitation
farmers agitation  
मुख्य बातम्या

कृषी विधेयकांविरोधात शेतकरी रस्त्यावर

वृत्तसेवा

चंडीगड ः केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी विधेयकांवरून पंजाब आणि हरियानाच्या शेतकऱ्यांमधील असंतोष वाढत चालला असून बुधवारी (ता.२३) हजारो शेतकरी विविध ठिकाणी रस्त्यांवर उतरले होते. हरियानाच्या पानिपतमधून दिल्लीच्या दिशेने कूच करणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांना पांगविण्यासाठी पोलिसांनी लाठीहल्ला करत अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. यावेळी पाण्याचे फवारेही मारण्यात आले. काही आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. युवक काँग्रेसकडून हे आंदोलन करण्यात आले. सरकारने मंजूर केलेली कृषी विधेयके ही शेतकऱ्यांसाठी डेथ वॉरंट ठरणार असून कोणत्याही स्थितीमध्ये आम्ही ते सहन करणार नाही. याआधी जे मिळत होते त्यावर आम्ही खूष होतो सरकारने अतिरिक्त देण्याचा प्रयत्न करू नये. शेतकऱ्यांची जमीन अदानी आणि अंबानीला विकण्याचा कट सरकारने आखला असल्याचा आरोप शेतकरी नेत्यांनी केला आहे. सरकारी विधेयकांचा निषेध करण्यासाठी भारतीय किसान युनियन आणि भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती यांनी २५ सप्टेंबर रोजी भारत बंदचे आवाहन केले आहे. पश्‍चिम बंगालमध्येही आंदोलन पंजाब, हरियाना, कर्नाटक, तेलंगणा, मध्य प्रदेश, छत्तीसगड पाठोपाठ पश्‍चिम बंगालमधील शेतकरीही कृषी विधेयकांना विरोध करत आहेत. बुधवारी पश्‍चिम बंगालमधील शेतकऱ्यांनी विविध ठिकाणी आंदोलने केली. पश्‍चिम बंगाल सरकारने संसदेतच कृषी विधेयकांना विरोध केला आहे. तसचे मागील काही दिवसांपासून राज्यात आंदोलने सुरु आहेत. बुधवारी मात्र या आंदोलनाची तीव्रता वाढली होती. संघटनांची भूमिका किसान युनियनचे प्रवक्ते राकेश टिकैत यांनी सांगितले की, ‘‘सरकारच्या या विधेयकांविरोधात धरणे आणि चक्का जाम आंदोलन करण्यात येईल. उत्तरप्रदेशात देखील प्रत्येक गावामध्ये हे आंदोलन होणार आहे.’’ या संघटनेचे सरचिटणीस धर्मेंद्र मलिक यांनी आम्ही शेतकऱ्यांची लढाई लढू. या विधेयकांच्या माध्यमातून सरकार देशामध्ये कंपनीराज आणू पाहत आहे असे सांगितले. प्रतिक्रिया शिरोमणी अकाली दलाच्या नेत्यांनी दिल्लीमध्ये भाजप नेत्यांच्या घराबाहेर चक्काजाम आंदोलन करावे. शेतकरी हिताची त्यांना एवढी चिंता असेल तर त्यांनी भाजपसोबतचे नाते देखील तोडावे. - कॅ. अमरिंदरसिंग,  मुख्यमंत्री पंजाब

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Book Review : ऋग्वेदाच्या पौराणिक अन् वैज्ञानिक स्पष्टीकरणाचा प्रयत्न

Drought Monitoring : दुष्काळ पाहणी पथकांचा सोपस्कार

Interview with Dashrath Tambale, Director of Atma : सेंद्रिय किंवा नैसर्गिक शेतीची सक्ती नाहीच...

Rural Story : जागरण

Sugarcane Management : खोडवा उसाचे व्यवस्थापन

SCROLL FOR NEXT