Farmers in Nanded district are waiting for 125 crore for crop insurance 
मुख्य बातम्या

नांदेड जिल्ह्यात शेतकऱ्यांना पीकविम्याच्या सव्वाशे कोटींची प्रतीक्षा

नांदेड : जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे खरिपातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. यामुळे इफ्को टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनीकडून विमाधारक शेतकऱ्यांना ४६१ कोटींचा विमा मंजूर झाला होता. यातील पहिल्या हप्त्यात ७३ टक्क्यांनुसार ३३६ कोटी ५३ लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यांवर जमा झाले.

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे खरिपातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. यामुळे इफ्को टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनीकडून विमाधारक शेतकऱ्यांना ४६१ कोटींचा विमा मंजूर झाला होता. यातील पहिल्या हप्त्यात ७३ टक्क्यांनुसार ३३६ कोटी ५३ लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यांवर जमा झाले. यानंतर शिल्लक २७ टक्क्यांनुसार १२४.४७ कोटी रुपये अद्याप प्रलंबित आहेत. विमा कंपनीकडे राज्य शासनाचा हप्ता मिळाला नसल्याने शेतकऱ्यांचे पैसे थकल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

पीकविमा योजनेअंतर्गत जिल्ह्यातील सात लाख ३५ हजार शेतकऱ्यांना सहा पिकांसाठी ४६१ कोटींचा विमा परतावा मंजूर झाला होता. या परताव्यातील ७३ टक्क्यानुसार ३३६ कोटी ५३ लाखांची विमा रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यांवर जमा झाली आहे. यानंतर राज्य शासनाकडून येणाऱ्या विमा हप्त्याची रक्कम विमा कंपनीला मिळाल्यानंतर उर्वरित रक्कम शेतकऱ्यांना मिळेल, असे कंपनीकडून सांगण्यात आले होते. यामुळे शेतकऱ्यांचे २७ टक्क्यांनुसार १२४ कोटी ४७ लाखांची रक्कम अद्याप प्रलंबित आहे.

जिल्ह्यातील एकूण एक हजार ६२२ गावांपैकी ३२८ गावांतील खरिपाच्या पिकांना पुराचा फटका बसला. तर, इतर एक हजार २९४ गावांतही सततच्या पावसामुळे पिकांचे नुकसान झाले. यामुळे विमा कंपनीकडून बुडीत क्षेत्रातील ३२८ गावातील सर्वच सोयाबीन विमाधारकांना हेक्टरी दहा हजार २२ ते २२ हजार ९५० रुपये जोखीम रक्कम मंजूर केली आहे. 

इतर एक हजार २९४ गावातील सर्वच सोयाबीन विमाधारकांना किमान ७२०० ते कमाल १००८ रुपये जोखीम मंजूर केली होती. एकूण ४६१ कोटींपैकी ७३ टक्क्यानुसार ३३६ कोटी ५३ लाखांची रक्कमच खात्यावर जमा झाली. तर, २७ टक्क्यांनुसार १२४ कोटी ४७ लाखांची रक्कम मिळणे बाकी आहे. राज्य शासनाने त्यांचा हिस्सा कंपनीकडे जमा केल्यानंतर उर्वरित रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यांवर जमा होईल, अशी माहिती कंपनीच्या सूत्राने दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Punjab Flood Funds: पंतप्रधानांच्या दौऱ्यानंतर मदतनिधीवरुन कलगीतुरा

Cotton Ginning Factory: जिनिंग कारखान्यांना कापसाची प्रतीक्षा

Onion Farmers: नाफेड, एनसीसीएफकडील कांदा देशात विकल्यास ते ट्रक पेटवू

Shaktipeeth Expressway: ‘शक्तिपीठ’च्या भूसंपादनासाठी बार्शीत प्रशासनाची दडपशाही

GM Crops: जीएम आणि जनुकीय संपादित तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यांना फायदा होईल का?; तज्ज्ञ म्हणतात...

SCROLL FOR NEXT