Farmers at Mhaswad The movement continues
Farmers at Mhaswad The movement continues 
मुख्य बातम्या

म्हसवड येथे शेतकरी आंदोलन सुरूच

टीम अॅग्रोवन

म्हसवड, जि. सातारा : शेतजमीन कब्जे वहिवाटीत वर्षानुवर्षे असलेल्या कुळहक्क शेतकऱ्यांचे दहिवडीनंतर आता म्हसवड येथील तलाठी कार्यालयाच्या आवारात ठिय्या आंदोलन सुरू आहे.

आंदोलनाचा मंगळवारी (ता. २) २० वा दिवस होता.  सुमारे १५० वर्षांपूर्वीपासून कब्जे वहिवाटीत असलेल्या शेतजमिनी मोठ्या संख्येने शेतकरी कसत आहेत. सातबारा सदरी रेषेच्यावर येथील सरंजामांची व रेषेच्याखाली कुळ असलेल्या शेतकऱ्यांची नोंदी आहेत. सरंजामांची पोकळ नोंद असलेली नावे कमी करून कसेल, त्याची जमीन या कायद्यांतर्गत  कुळधारक शेतकऱ्यांचीच नावे सातबारा सदरी नोंद करण्यासाठी श्रमिक मुक्ती दलातर्फे डॉ. भारत पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू आहे. 

जमीन मालकी हक्काचा वाद 

सरकारने वेळोवेळी कुळ हक्काबाबत कायदे केले. परंतु योग्य महसूल कर्मचारी व अधिकाऱ्यांनी म्हसवड भागातच त्याची अंमलबजावणी केली नाही. त्यामुळे कुळ व सरंजाम यांच्यात जमीन मालकी हक्काचा वाद उफाळला आहे. दहिवडी प्रांताधिकारी कार्यालयासमोर ११ फेब्रुवारीपासून ठिय्या आंदोलन सुरू आहे. यापूर्वी टेंभू पाण्यासाठी १६ गावांच्या लोकांचे नेतृत्व अनिल देसाई यांनी केले होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

महाराष्ट्रासाठी आर्थिक विकासाची ‘गॅरंटी’, नवी दिल्ली भेटीत पंतप्रधानांचे आश्वासन

Crop Insurance : सोयाबीन पिकाला विम्याचा लाभ मिळालाच नाही

Pre Kharif Review Meeting : बोगस बियाणे विक्री रोखण्यासाठी भरारी पथके नेमा

Sharad Pawar : सध्याचे केंद्रातील सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात: शरद पवार

Mumbai Weather : मुंबईसाठी २२ दिवस धोक्याचे

SCROLL FOR NEXT