Farmers line up in Akola to buy fertilizers and seeds 
मुख्य बातम्या

खते, बियाणे खरेदीसाठी अकोल्यात शेतकऱ्यांच्या रांगा

आगामी हंगामासाठी अवघे काही दिवस उरले असून बाजारपेठेत बी-बियाणे दाखल होत आहे. कापूस उत्पादक पट्ट्यातील शेतकऱ्यांना लागवडीसाठी बीटी कपाशीचे बियाणे विक्रेत्यांपर्यंत पोहोचले असून, लवकरच विक्री सुरू होणार आहे.

टीम अॅग्रोवन

अकोला ः आगामी हंगामासाठी अवघे काही दिवस उरले असून बाजारपेठेत बी-बियाणे दाखल होत आहे. कापूस उत्पादक पट्ट्यातील शेतकऱ्यांना लागवडीसाठी बीटी कपाशीचे बियाणे विक्रेत्यांपर्यंत पोहोचले असून, लवकरच विक्री सुरू होणार आहे. खत, बी-बियाणे खरेदीसाठी सकाळपासूनच रांगा लागत असल्याचे चित्र बघायला मिळत आहे.

आगामी हंगामासाठी बाजारपेठेत गेल्या आठवड्यापासून बियाण्याचा पुरवठा वाढलेला आहे. प्रामुख्याने सोयाबीन, कपाशीचे बियाणे तुलनेने अधिक प्रमाणात उपलब्ध होत आहे. खासगी कंपन्यांकडून बियाण्याचा सातत्याने पुरवठा केला जात आहे. गुलाबी बोंड अळीला अटकाव करण्यासाठी बीटी कपाशीची लागवड एक जूनपूर्वी केली जाऊ नये, असा प्रयत्न कृषी विभाग करीत आहे. प्री-मॉन्सून कपाशी लागवड टाळण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आलेले आहे. मात्र तरीही काही शेतकरी बियाण्याबाबत चौकशी करीत आहेत.

सध्या कपाशीचे बियाणे विक्रेत्यांपर्यंत पोहोचले तरी त्याची मोठ्या प्रमाणात विक्री सुरू झालेली नाही. सोयाबीन व इतर बियाणे विक्री होत आहे. शेतकऱ्यांचा ओढा खतांकडे अधिक आहे. दरवाढीमुळे जुना साठा मिळवण्यासाठी गेले तीन चार दिवस चढाओढ सुरू होती. तर जुना साठा असलेल्यांनी विक्री करण्याचे टाळले होते. आता खतांना अनुदान वाढविल्याने जुनेच दर विक्रीसाठी ठेवण्यात आल्याने परिस्थिती निवळली आहे. तरीही काही ठिकाणी रांगा लागत आहेत.   वेळ कमी असल्याने रांगा कृषी सेवा केंद्र मध्यंतरी आठवडाभर बंद ठेवण्यात आली. त्यानंतर सकाळी ११ वाजेपर्यंत चालू ठेवण्याची परवानगी मिळाली. त्यात सुधारणा करीत पुन्हा ही मुदत दुपारी तीन वाजेपर्यंत वाढविण्यात आली. दुकाने सुरू ठेवण्यास मर्यादा असल्याने शेतकरी सकाळपासूनच रांगे उभे राहत असल्याचे दिसून येत आहे. मूर्तिजापूर येथे गेले काही दिवस सातत्याने रांगा लागत आहेत. वेळ कमी असल्याने या रांगा लागत असल्याचे अधिकारी सांगत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tomato Pests: टोमॅटो पिकातील रस शोषक किडींना घाला आळा

Nashik Drought : नाशिक जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा; स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या लासलगाव येथील बैठकीत ठराव

Tanker Water Supply: मागेल त्याला टँकरने पाणी : पालकमंत्री चंद्रकांत पाटील

Irrigation Water Rates: उपसा सिंचनच्या पाणीवापराचे दर निश्चित; कार्यकारी अभियंता सीमा मोहिते यांची माहिती

Maharashtra Cabinet Decisions: दुष्काळ निवारणासाठी सरकारचे मोठे पाऊल, कृषी विभागाचा सुधारित आकृतीबंधही रद्द, मंत्रिमंडळ बैठकीत ५ महत्त्वाचे निर्णय

SCROLL FOR NEXT