Farmers in Kavathemahankal waiting for help
Farmers in Kavathemahankal waiting for help 
मुख्य बातम्या

कवठेमहांकाळमधील शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत

टीम अॅग्रोवन

कवठेमहांकाळ, जि. सांगली : तालुक्‍यात गेल्या दोन तीन महिन्यांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे प्रचंड नुकसान झाले होते. दिवाळीला शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे वर्ग करणार, असे शासनाने जाहीर केले होते. मात्र दिवाळी होऊन महिना उलटत आला तरी शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा झाली नाही. तालुक्‍यातील साठ गावांपैकी केवळ १५ गावांमधील ६ हजार ४०० शेतकऱ्यांच्या खात्यावर १ कोटी ९८ लाख रुपये वर्ग झाले. उर्वरित ४५ गावांमधील ९ हजार १५२ शेतकरी अद्याप नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत आहेत.

तालुक्‍यात पावसाने जोरदार तडाखा दिला. त्यामुळे शेतकऱ्यांचे द्राक्षबागा, उसासह इतर कडधान्य पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अवकाळी पावसामुळे पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश शासनाने कृषी विभाग व तलाठ्यांना दिले. तालुक्‍यात ६० गावांमधील तब्बल १५ हजार ५५२ शेतकऱ्यांचे ४ हजार ३३२ हेक्‍टरवर पंचनामे पूर्ण झाले. पंचनामे पूर्ण केल्यामुळे शेतकऱ्यांच्या मनामध्ये आशेचा किरण निर्माण झाला. पावसामुळे झालेली नुकसान भरपाई लवकर शेतकऱ्यांना मिळेल, अशी आशा वाटत होती. दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना सर्व रक्कम खात्यावर जमा करू, असे आश्वासन शासनाने दिले. मात्र दिवाळीनंतर महिना उलटला तरी अद्याप काही शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा झाली नाही.

तालुक्‍यात अतिवृष्टीच्या पावसामुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसान भरपाई संबंधित शेतकऱ्याच्या खात्यावर वर्ग करण्यासाठी वरिष्ठ कार्यालयाला निधीची मागणी केली आहे. अद्याप निधी उपलब्ध झाला नाही. निधी उपलब्ध झाल्यास तत्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रथम वर्ग केला जाईल. बी. जे. गोरे, तहसीलदार, कवठेमहांकाळ.

तालुक्‍यातील अतिवृष्टीच्या पावसामुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईची निधीची मागणी केली आहे लवकरच दुसऱ्या टप्प्यात निधी मिळाल्यास संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होईल. - एम. जे. तोडकर तालुका कृषी अधिकारी, कवठेमहांकाळ.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sadabhau Khot : 'आधी कडकनाथवर बोला', भर सभेत शेतकऱ्यांचा सदाभाऊ खोतांना सवाल

Onion Export Ban : केंद्र सरकारच्या चलाखीमुळे कांदा निर्यातीवरील लगाम कायम; शेतकऱ्यांना कितीपत फायदा होणार?

Kolhapur Water Shortage : गावांना टँकरद्वारे पाण्याची गरज, लोकप्रतिनिधी, प्रशासन निवडणुक कामात व्यस्थ

Agriculture Industry : उद्योगाच्या घरी रिद्धी-सिद्धी...

Success Story : अल्पभूधारकांच्या शेतात फुलली हिरवाई

SCROLL FOR NEXT