क्रांती कारखान्याची वाटचाल शेतकरी हिताची ः जिल्हाधिकारी
क्रांती कारखान्याची वाटचाल शेतकरी हिताची ः जिल्हाधिकारी 
मुख्य बातम्या

क्रांती कारखान्याची वाटचाल शेतकरी हिताची ः जिल्हाधिकारी

टीम अॅग्रोवन

कुंडल, जि. सांगली ः क्रांती कारखाना अल्पावधीतच शेतकऱ्यांच्या विश्‍वासास पात्र ठरला आहे, आणि त्याची वाटचाल ही शेतकरी हिताची आहे, म्हणूनच अशा कारखान्याचा राज्य आणि देश पातळीवरील अनेक पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी विजय काळम-पाटील यांनी केले.

कुंडल (ता. पलूस) येथील क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखान्याच्या १७ व्या ऊस गळीत हंगाम प्रारंभ प्रसंगी बोलत होते.

जिल्हाधिकारी विजय काळम-पाटील म्हणाले, ‘या कारखान्याने आजवर राज्य आणि देश पातळीवरील १४ पुरस्कार मिळविले आहेत हिच पोच पावती आहे. सुरवातीला क्रांती अग्रणी जी. डी. बापूंच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले. काटा पूजन नवनिर्वाचित उपाध्यक्ष आत्माराम हारुगडे उभयतांच्या हस्ते झाले.

या वेळी उपविभागीय अधिकारी विजय देशमुख, तहसीलदार राजेंद्र पोळ, क्रांती दूध संघाचे अध्यक्ष किरण लाड, जिल्हा परिषद सदस्य शरद लाड, सरपंच प्रमिला पुजारी, पंचायत समिती उपसभापती अरुण पवार, सचिव वसंत लाड आणि सर्व आजी, माजी संचालक, शेतकरी सभासद उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यकारी संचालक सी. एस. गव्हाणे यांनी केले. सूत्रसंचालन श्रीकांत माने यांनी केले. तर संचालक अंकुश यादव यांनी आभार मानले.

‘कारखान्याने ठिबक सिंचन, पायलट सारख्या ऊस उत्पादन वाढीसाठीच्या योजना कार्यक्षमरीत्या अमलात आणल्याने सरासरी एकरी ऊस उत्पादन २८ मे. टनावरून ५५ मे. टनांपर्यंत गेले आहे. कारखान्यात १९ मेगावॉट निर्मिती केली जात आहे. तसेच ६० हजार प्रति दिवस क्षमतेचा आसवणी प्रकल्प नुकताच सुरू करण्यात आला आहे. गत हंगामात साखरेचे दर गडगडले असले, तरी शेतकऱ्यांची नियमाप्रमाणे सर्व देणी दिली आहेत. एफआरपीपेक्षा जादाची रक्‍कम येत्या दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यांवर वर्ग करीत आहोत.’ - अरुण लाड, अध्यक्ष, क्रांती कारखाना

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Production : सांगलीत साखर उत्पादनात सात लाख क्विंटलने वाढ

MahaRally Meeting : धुळ्यात महारॅलीची प्रशासनाकडून जय्यत तयारी

Severe Water Shortage : लोकसभेच्या रणधुमाळीत सातारा जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई

Kharif Sowing : साडेसात लाख हेक्टरवर जिल्ह्यात खरिपाचा पेरा

Shaktipeeth mahamarg : 'रस्त्यांवरच्या लढाईची शेतकऱ्यांनी तयारी करावी', शक्तिपीठ विरोधात शेतकऱ्यांची एकजूठ

SCROLL FOR NEXT