पावसाच्या हजेरीने शेतकऱ्यांना दिलासा
पावसाच्या हजेरीने शेतकऱ्यांना दिलासा 
मुख्य बातम्या

पावसाच्या तुरळक हजेरीने हलका दिलासा

टीम अॅग्रोवन

पुणे: पावसाच्या दीर्घ खंडानंतर राज्यात दोन दिवसांपासून पुन्हा हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या जलधारा बरसण्यास सुरवात झाली आहे. पाण्याच्या अभाव, उन्हाचा वाढलेला चटका यामुळे खरिपाची पिके माना टाकायला लागली आहेत. पावसाच्या हजेरीने अडचणीत आलेल्या खरीप पिकांना जीवदान मिळणार असून, शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. परभणीतून जिंतूर येथे सर्वाधिक ९२ मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याचे कृषी विभागातर्फे सांगण्यात आले. दोन दिवसांपासून मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा आणि विदर्भात हलक्या ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडत आहे. विशेषत: पावसाने सर्वाधिक दडी मारलेल्या भागातच पडत असलेल्या या पावसामुळे परतीच्या पावसाची चाहूल लागली आहे. सकाळपासून वाढलेला उन्हाचा चटका, प्रचंड उकाड्यानंतर दुपारी दाट ढग गाेळा होऊन पाऊस पडत आहे. मंगळवारी (ता. १८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये मध्य महाराष्ट्रातील जळगाव, नगर, सांगली, सोलापूर, मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद, परभणी अाणि विदर्भातील बुलडाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी तर उर्वरित भागांत तुरळक ठिकाणी हलक्या ते जोरदार स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली आहे. काही ठिकाणी तर पावसाचा जोर अधिक असल्याने थोड्यात वेळात शेतांमध्ये पाणी जमा होत आहे.  मंगळवारी (ता. १८) राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस मिलिमीटरमध्ये (स्रोत : कृषी विभाग) : मध्य महाराष्ट्र : मनमाड २०, कुऱ्हे २१, तामसवाडी ३२, चाळीसगाव ५८, हातले ३०, तळेगाव ५५, खडकी ५३, नाळेगाव ३६, सावेडी २९, कडेगाव ३८, वाळकी २१, शेवगाव २०, एरंडगाव ३२, सलाबतपूर २०, कुकाणा २५, चांदा २२, घोडेगाव २४, सोनई ३०, वडाळा २१, बारामती २६, अंथुर्णी २५, मंद्रूप २१, सांगोला २३, लवंग २४, संख ४०, माडग्याळ ४६, दिघंची ३५. मराठवाडा : लोहगाव ३८, पैठण ३१, जातेगाव २२, चाकळआंबा १९, परळी २२, कावडगाव ४६, कासारशिर्सी १९, जळकोट ३०, आंभी २६, मुरूम ३७, लोहारा २०, माकणी २६, पेठवडज २७, गंगाखेड २८, जिंतूर ९२, बोरी २९, चारठाणा ३०.  विदर्भ : रामतीर्थ २३, मारेगाव २७, कुंभा ३०.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Lemon Rate : लिंबाचे दर पोहोचले ६,५०० रुपयांवर

Hirda Picking : जुन्नर तालुक्यात हिरडा गोळा करण्याची लगबग

Yedgaon Dam Victim : येडगाव धरणग्रस्त शेतकऱ्यांसाठी धरणात पाणीसाठा राखून ठेवावा

Interview with PM Narendra Modi : आर्थिक विकासाची महाराष्ट्रासाठी ‘गॅरंटी’

Sugar Market : कोट्यापेक्षा जादा साखर विक्री कारखान्यांना पडली महागात

SCROLL FOR NEXT