नगरमधील दूध उत्पादकांनी नातेवाईक, मित्रांना दिले दूध भेट
नगरमधील दूध उत्पादकांनी नातेवाईक, मित्रांना दिले दूध भेट 
मुख्य बातम्या

नगरमधील दूध उत्पादकांनी नातेवाईक, मित्रांना दिले दूध भेट

Suryakant Netke

नगर ः चार दिवसांपासून दूध दरप्रश्‍नी सुरू असलेल्या आंदोलनामुळे दूध संकलन बंद आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक भागात दूध उत्पादकांनी नातेवाईक, मित्रांना दूध आणि दुधाच्या पदार्थांचे वाटप केले. शहरात दुधाची अडचण निर्माण झाली असली तरी ग्रामीण भागात मात्र हॉटेलसह अन्य ठिकाणी दहा ते बारा रुपये लिटरने दूध विकले गेले. तीन- चार दिवसांत लाखो लिटर दुधाचे वाटप झाले.

दुधाला दर नसल्याने पाच रुपये प्रती लिटर अनुदान मिळावे, यासाठी आंदोलन सुरू असल्याने दुधाचे संकलन झाले नाही. अजूनही अनेक शेतकरी दूध घालण्यास तयार नाहीत. त्यामुळे प्रत्येक दूध उत्पादकांच्या घरी मोठ्या प्रमाणात दूध शिल्लक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी दुधापासून तयार होणारे खवा, पनीर, तूप, दही तयार केले. अनेकांनी दुधासह अन्य दुधाच्या पदार्थाचे नातेवाईक, मित्रांना वाटप केले. अगदी पन्नास किलोमीटरवरही नातेवाइकांनी दूध आणि दुधाच्या पदार्थांची भेट पोचते आहे. काहींनी गावाजवळच्या शहरात दहा ते बारा रुपये लिटरने दुधाची विक्री केली आहे.

नगर तालुक्‍यातील देऊळगाव सिद्धी येथे दुधाचे सहा ते सात प्लॅन्ट आहेत. तूप, पनीर, खवा, दह्यासह अन्य उपपदार्थ येथे तयार केले जातात. गावांतील शेतकऱ्यांकडून पंधरा हजार लिटर तर अन्य शेजारच्या गावांचे मिळून देऊळगावांत पन्नास हजार लिटर दूध संकलन होते. आंदोलनामुळे येथे चार दिवसांपासून संकलन बंद आहे. त्यामुळे येथील लोकांनी दुधापासून खवा, तूप व अन्य पदार्थ तयार करून घेतले आणि गावांत नातेवाइकांसह गरजूंना मोफत वाटले. त्यामुळे शहरात दूध मिळत नसले तरी उत्पादकांच्या गावात मुबलक दूध उपलब्ध असल्याचे सध्या चित्र आहे. दरम्यान, दोन दिवसांत खव्याचेही मोठ्या प्रमाणात उत्पादन झाल्याने खव्याचे दर पन्नास टक्‍क्‍यांनी खाली आले आहेत.

 नगर जिल्ह्यामधील स्थिती (१७ जुलै )

  • नियमित दूध संकलन ः  २४ लाख लिटर
  • आंदोलनाच्या काळात दुसऱ्या दिवशीचे संकलन ः  ३ लाख लिटर
  • दुधाची कमी दरात विक्री ः २ लाख लिटर
  • पनीर तयार केलेले दूध ः २ लाख लिटर
  • दही तयार केलेले दूध  ः  ३ लाख लिटर
  • खवा तयार केलेले दूध  ः  ७ लाख लिटर
  • अन्य उपपदार्थ तयार करण्यासाठी वापरलेले दूध ः २ लाख लिटर
  • दुधाचे मोफत वाटप ः ३ लाख लिटर
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Cow Market : आळेफाट्याच्या बाजारात १६५ गायींची विक्री

    Urea Racket : युरिया रॅकेटविरोधात अखेर गुन्हा दाखल

    Jowar Market : हमीभावापेक्षा कमी दराने विकतेय ज्वारी

    Bhavantar Yojana : भावांतर योजनेचे गाजर

    Tur Market : विदर्भातील बहुतांश बाजारांत तूरदर दबावात

    SCROLL FOR NEXT