Farmers disappointed by closure of bull market in Akola
Farmers disappointed by closure of bull market in Akola 
मुख्य बातम्या

अकोल्यात बैलबाजार बंद ठेवल्याने शेतकऱ्यांचा अपेक्षाभंग 

टीम अॅग्रोवन

अकोला ः कोरोनामुळे लॉकडाऊन सुरू असल्याने सर्वत्र बैलबाजार बंद पडलेले आहेत. या परिस्थितीत काही शेतकरी सोशल मीडियाचा वापर करीत बैलजोड्यांची छायाचित्रे फिरवत आहेत. बाजार सुरू होण्याची कुठलीही चिन्हे सध्या नसल्याने या हंगामासाठी बैलजोडीची खरेदी-विक्री करताना शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे. बैलबाजार सुरू करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांपासून मुख्यमंत्र्यांपर्यंत मागणी होऊनही यावर कुठलाही तोडगा काढण्यात आलेला नाही. 

लॉकडाऊन नव्याने वाढविण्यात आले असून या टप्प्यात तरी शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेऊन बैलबाजाराला सुट मिळेल, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती. मात्र, शेतकऱ्यांचा अपेक्षाभंग झाला आहे. खरीप हंगाम अवघा १५ दिवसांवर आलेला आहे. पहिल्यांदाच बैलबाजार बंद असल्याने शेतकऱ्यांना बैलजोड्यांची खरेदी-विक्री करण्यास अडचणी उभ्या राहलेल्या आहेत. 

ग्रामीण भागात आजही छोटे-मोठे शेतकरी हे शेती कामांसाठी बैलजोड्यांचा वापर करतात. हंगामापूर्वी मशागतीची कामे सुरू झाली आहेत. या काळात अनेक शेतकरी बैलजोड्यांची खरेदी-विक्री करतात. यंदा गेल्या दोन महिन्यांपासून बैलबाजार बंद झालेले आहेत. १८ मे पासून नव्याने सुरू होणाऱ्या लॉकडाऊनमध्ये या बाजाराला सुट मिळेल, अशी शक्यता होती. परंतु शासनाने आपल्या धोरणात कुठलाही बदल केलेला नाही. परिणामी अपेक्षाभंग झाला आहे. 

सोशल मीडियाचा वापर  बैलबाजार बंद असल्याने शेतकऱ्यांना सोशल मीडियाचा आधार होत आहे. शेतकरी व्हॉट्सॲपवर बैलांचे फोटो पाठवून सौदे करीत आहेत. मात्र, बाजार बंद मुळे चांगल्या बैलजोडीच्या किमती एक लाखावर पोचल्या आहेत. अनेकांना अपेक्षित असलेले बैल मात्र पुरेशा प्रमाणात मिळेनासे झालेले आहेत. सर्वसामान्य शेतकऱ्याला बैलजोडी मिळण्यात अडचणी वाढलेल्या आहेत. 

बैलबाजार बंद असल्याने बैलजोड्यांची खरेदी कोठून व कशी करावी हा पेच तयार झालेला आहे. माझ्यासह अनेक शेतकरी चांगल्या बोलजोड्यांचा शोध घेत आहेत. शासनाने शेतकऱ्यांच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असलेला हा बैलबाजार सुरू करण्याचा निर्णय घ्यायला हवा होता. अजूनही वेळ असून यादृष्टीने बैलबाजार सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे.  - जगदेवराव आखाडे, शेतकरी, डोणगाव, जि. बुलडाणा 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Production : सांगलीत साखर उत्पादनात सात लाख क्विंटलने वाढ

MahaRally Meeting : धुळ्यात महारॅलीची प्रशासनाकडून जय्यत तयारी

Severe Water Shortage : लोकसभेच्या रणधुमाळीत सातारा जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई

Kharif Sowing : साडेसात लाख हेक्टरवर जिल्ह्यात खरिपाचा पेरा

Shaktipeeth mahamarg : 'रस्त्यांवरच्या लढाईची शेतकऱ्यांनी तयारी करावी', शक्तिपीठ विरोधात शेतकऱ्यांची एकजूठ

SCROLL FOR NEXT