निकृष्ट बियाण्यांमुळे ढवळपुरी येथील शेतकऱ्याचे सहा लाखांचे नुकसा
निकृष्ट बियाण्यांमुळे ढवळपुरी येथील शेतकऱ्याचे सहा लाखांचे नुकसा 
मुख्य बातम्या

निकृष्ट बियाण्यांमुळे ढवळपुरी येथील शेतकऱ्याचे सहा लाखांचे नुकसान

दत्ता झगडे

पारनेर : शेतात वेगळा प्रयोग करुन चांगले उत्पन्न मिळविण्याच्या हेतूने ढवळपुरी (ता. पारनेर) येथील शिवाजी चौधरी या शेतकऱ्याने स्वीट कॉर्नचे पीक घेतले. मात्र बियाणे निकृष्ट दर्जाचे निघाल्यामुळे त्या शेतकऱ्याला तब्बल सहा लाखांचे नुकसान झाले.

शेतकऱ्याने बियाणे कंपनीच्या विरोधात ग्राहक मंचाकडे तक्रार करणार असल्याचे सांगितले.

ढवळपुरी येथील प्रगतशील शेतकरी शिवाजी चौधरी यांनी नगर येथून एका कंपनीचे मका शुगर ७५ या जातीचे पाच किलो बियाणे घेतले. १२ जूनला शेतीची योग्य मशागत करुन सरी पध्दतीने मक्याची लागवड केली. मात्र मकेला पांगारी फुटवे फुटले.

चौधरी यांनी याबाबत कंपनीच्या अधिकाऱ्याकडे तक्रार केली. मात्र कंपनीच्या प्रतिनिधीने ते फुटवे खोडण्यास शेतकऱ्याला सुचविले. त्यानंतरही फुटवे येतच राहिले. जेव्हा मकेला कणसे यायला लागली, तेव्हा एका कणसाला दोन-दोन कणसे फुटली. शेतकऱ्याने या बाबत पुन्हा कंपनीकडे तक्रार केली असता त्यांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली.

त्यानंतर चौधरी यांनी जिल्हा कृषी अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केली. त्या तक्रारीनंतर ८ ऑगस्ट रोजी उपविभागीय कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, सहाय्यक मका पैदासकर डॉ. जी. सी. शिंदे, तालुका कृषी अधिकारी रामदास दरेकर कंपनीचे प्रतिनिधी विकास मोराळे यांच्या तालुका बियाणे तक्रार निवारण समितीने पिकाची पाहणी केली.

या पाहणीत समितीने ४१ टक्के मकेला पांगारी फुटवे फुटल्याचे तर ३२ टक्के झाडांना एकाच ठिकाणी दोन ते तीन कणसे निघाल्याचे सांगितले. त्याचा कणसाच्या गुणवत्तेवर विपरीत परिणाम झाल्याचा अहवाल दिला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Season : देशातील साखर हंगाम अंतिम टप्प्यात

Weather Update : कोकणात उन्हाचा चटका ठरणार तापदायक

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

SCROLL FOR NEXT