नाशिक : ‘कांद्यावरील निर्बंध हटवावेत, कांद्याला हमीभाव द्यावा,’ अशी मागणी करीत कांदा उत्पादकांनी शुक्रवारी (ता.२७) नाशिकचे निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांना निवेदन दिले.
नाशिक : ‘कांद्यावरील निर्बंध हटवावेत, कांद्याला हमीभाव द्यावा,’ अशी मागणी करीत कांदा उत्पादकांनी शुक्रवारी (ता.२७) नाशिकचे निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांना निवेदन दिले. 
मुख्य बातम्या

कांद्यावरील निर्बंध हटवा; हमीभाव द्या

टीम अॅग्रोवन

नाशिक : मागील तीन वर्षांपासून आम्ही कांदा तोट्यात विकला आहे. आम्हाला आतातरी हक्काचा भाव मिळूद्या. कांद्यावर घातलेले निर्बंध हटवा. खर्च निघेल इतका तरी कांद्याला हमीभाव द्यावा, अशी मागणी नाशिक जिल्ह्यातील शेकडो कांदा उत्पादकांनी जिल्हा प्रशासनाकडे केली.  बाजारात कांदा आवक कमी व मागणी जास्त अशी स्थिती झाली असताना कांद्याचे वधारत होते. मात्र शासकीय यंत्रणा हे दर कमी राहतील यासाठी प्रयत्नशील राहिली आहे. दरम्यान, मागील ३ दिवसांपासून कांदा दरात घसरण सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर कांदा उत्पादकांत सरकारी यंत्रणेविरोधात असंतोष पसरला आहे. शुक्रवारी (ता.२७) नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादकांनी नाशिकला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेला. जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन सुटीवर असल्याने त्यांची भेट झाली नाही. त्यांच्या जागी नाशिकचे निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांनी निवेदन स्वीकारले.  कांद्याला हमीभाव द्या कांदा शेती अनेक समस्यांमधून जात आहे. खते, कीडनाशके, मजुरी यांचे दर गगनाला भिडले आहेत. बाजारात मिळणाऱ्या दरातून शेतकऱ्याचा प्रपंच चालणे मुश्किल बनले आहे. यात कांद्याला तीन हजारा़च्या वर दर मिळाल्याने दिलासा मिळत असताना सरकारी यंत्रणांनी दर पाडण्याचा प्रयत्न केला आहे. कृषीप्रधान देशात हे दुदैवी आहे. शासनाने कांदा शेतीला सावरावे, हमीभाव द्यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. या वेळी प्रवीण रौदळ, श्रीकांत वाघ, दीपक वाघ, संदीप शिरसाठ, सुनील पगार, हिरामण सूर्यवंशी, संदेश पगार आदी शेतकरी उपस्थित होते. कांद्याचे दर पाडण्याची भूमिका प्रशासनाची नाही. आम्ही फक्त नेमका किती कांदा आवक झाला व व्यापाऱ्यांकडून पाठवला गेला, याची माहिती घेत आहोत. व्यापऱ्यांकडील कांद्याची तीन दिवसांपेक्षा अधिक काळ साठवणूक होणार नाही याकडे लक्ष देत आहोत. आम्ही शेतकऱ्यांसोबतच आहोत. - रामदास खेडकर,  निवासी उपजिल्हाधिकारी    

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

SCROLL FOR NEXT