ऊस उत्पादक शेतकरी देणार शहिदांच्या कुटुंबीयांना मदत
ऊस उत्पादक शेतकरी देणार शहिदांच्या कुटुंबीयांना मदत 
मुख्य बातम्या

ऊस उत्पादक शेतकरी देणार शहिदांच्या कुटुंबीयांना मदत

टीम अॅग्रोवन

कोल्हापूर : पुलवामा जिल्ह्यातील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांसाठी नांदणी (ता. शिरोळ) येथील शेतकऱ्यांनी अनोखे मदत कार्य हाती घेतले आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी तोडणी झालेल्या उसाला प्रतिटन ऊसामागे एक रुपयांची मदत जोडण्याची मोहीम सुरू केली आहे. जमलेला निधी शहिदांच्या कुटुंबीयांकडे सुपुर्द केला जाणार आहे.  भाजीपाला उत्पादनातील अग्रेसर गाव म्हणून नांदणीकडे पाहिले जाते. मात्र, ऊसपट्टा अशीही गावाची ओळख आहे. सुपीक जमीन आणि कष्टाच्या तयारीमुळे गावातील भाजीपाला आणि ऊस शेतीमुळे एक सधन गाव म्हणून नांदणीकडे पाहिले जाते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन पुलवामा जिल्ह्यातील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांसाठी मदत करण्यासाठी तुटलेल्या प्रतिटन उसामागे एक रुपयांची मदत गोळा करण्याची संकल्पना पुढे आणली. याला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसादही मिळू लागला आहे.  स्वाभिमानीच्या या संकल्पनेला छोट्या मोठ्या सर्वच शेतकऱ्यांकडून कौतुक केले जात आहे. देशासाठी शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांची वाताहात होऊ नये, यासाठी ही अनोखी मदतीची मोहीम हाती घेण्यात आली आहे. यातून हजारो रुपये जमणार असून ही रक्कम शहीद कुटुंबीयांना दिली जाणार आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नांदणी शाखेचा १७ फेब्रुवारी रोजी वर्धापन दिन साजरा केला जातो. यंदाच्या वर्धापनदिनी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. कार्यकर्त्यांसह ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. या वेळी देशासाठी शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांसाठी मदतीची संकल्पना मांडण्यात आली. या वेळी तुटलेल्या उसामागे एक रुपयांची मदत गोळा करण्याचा निर्धार करण्यात आला. या वेळी काही शेतकऱ्यांनी याला प्रतिसाद देत मदतही दिली. पंधरा हजार रुपये बघता बघता जमले आणि मदतीचा ओघ सुरू झाला.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Weather Update : अकोला, सोलापुरात हंगामातील उच्चांकी तापमान

Indian Politics : चीनवरून काँग्रेसचा मोदी सरकारवर पुन्हा हल्लाबोल

Accident Insurance Scheme : अपघात विमा योजनेतून ४५० शेतकरी कुटुंबांना मदत

Banana Sunburn : उन्हाच्या तीव्रतेमुळे जळताहेत केळीची रोपे

Summer Heat : मालेगावात वैशाखाआधीच वणवा

SCROLL FOR NEXT