शेतकऱ्यांनी बोंबा-बोंब करीत केले अर्ध नग्न आंदोलन
शेतकऱ्यांनी बोंबा-बोंब करीत केले अर्ध नग्न आंदोलन 
मुख्य बातम्या

कानगावात शेतकरी संपावर, केले अर्ध नग्न आंदोलन

सकाळ वृत्तसेवा

वरवंड, जि. पुणे : कानगाव (ता.दौंड)येथे शेतकरऱयांनी पुकारलेल्या राज्यव्यापी शेतकरी आक्रोश आंदोलन-संपाकडे शासन डोळेझाक करीत असल्याच्या पाश्वभुमीवर शेतकऱ्यांनी शासनाच्या विरोधात चांगलाच एल्गार केला. शासनाचे लक्ष वेधुन घेण्यासाठी शेतकऱ्यांनी बोंबा-बोंब करीत अर्ध नग्न आंदोलन केले. शेतकऱ्यांची संपुर्ण कर्जमाफी आणि शेती संदर्भातील विविध मागण्यांसाठी कानगाव येथे शेतकऱ्यांचे शेतकरी आक्रोश आंदोलन व चक्री उपोषण सुरु आहे. काल (सोमवारी) आंदोलनास पाच दिवस झाले आहेत. या दरम्यान, जिल्हा व इतर जिल्ह्यातुन १२० गावांनी आंदोलन व संपाला पाठींबा दिला आहे.तालुक्यासह इतर तालुक्यातील विविध पक्षाच्या दिग्ज नेत्यांनी आंदोलनाला भेट देवुन पाठींबा दिला आहे. मात्र, सरकार शेतकऱयांच्या संबधीत मागण्यांकडे साइस्कर डोळेझाक करीत असल्याचा आरोप आंदोलक शेतकरी करु लागले आहे. परिणामी, सरकारचे लक्ष वेधण्यासाठी वेगवेगळ्या मार्गाने आंदोलन व संप करीत आहेत.सोमवारी शेतकऱ्यांनी चांगलाच एल्गार केला. विठ्ल मंदिरात आंदोलकांनी दुपारी बारा वाजता चक्क अर्ध नग्न आंदोलन केले.यावेळी बोंबा-बोंब करीत सरकारच्या शेती विरोधी धोरणाचा निषेध करण्यात आला.आंदोलनात तरुणांसह,जेष्ठांची मोठी संख्या होती.माऊली शेळके,सरपंच संपत फडके यांनी घोषणा बाजी करीत मागण्या मांडल्या. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता.दरम्यान,यावेळी शेतकरी आक्रोश कृती समितीचे सदस्य भानुदास शिंदे म्हणाले, शेती संदर्भातील विविध मागण्यासाठी गेली पाच दिवसापासुन शेतकऱयांचे आंदोलन सुरु आहे. मात्र, सरकार दखल घेत नाही. आता सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आम्ही आंदोलनाची तिव्रता लवकरच वाढविणार आहे. सरकार शांततेच्या मार्गाने दखल घेतना दिसत नाही. मंगळवारपासुन चक्री उपोषण करणाऱे सोडुन इतर शेतकरी इतर गावांमध्ये जावुन संपासाठी चर्चा करणार आहे. रस्त्यावर उतरण्याची आमची तयारी झाली आहे. आम्ही आमचे आदोलन सुरुच ठेवणार आहे.वेळपडली तरी आम्ही सामुदायीक आत्मदहन करण्याचा पवित्रा घेणार असल्याचाही इशारा शिंदे यांनी दिला. अॅड.भास्कर फडके म्हणाले, ''आमच्या मागण्या रास्त आहे.शेतकऱयांना उत्पादन खर्चाच्या तुलनेत अपेक्षीत बाजार भाव मिळत नाही. त्यामुळे शेतकरी कर्ज बाजारी झाला आहे. आम्हाला आमच्या घामाचे दाम द्या. मात्र, सरकार याकडे डोळेझाक करीत आहे. आम्ही शांतता मार्गाने आंदोलन-संप केला आहे.पण शेतकऱयांच्या लढ्यासाठी रस्त्यावर उतरण्याची आमची तयारी आहे.'' यावेळी सरपंच संपत फडके, माऊली शेळके आदींनी मनोगत व्यक्त करीत सरकारवर आगपाखड केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Delhi Farmers' protest : भाजपच्या उमेदवारांविरोधात पंजाबमध्ये शेतकऱ्यांचा रोष वाढला; एसकेएमचा विरोध कायम

Lok Sabha Constituency : कोल्हापूर जिल्ह्यातील ३७ लाख ५० हजार मतदारांचा कौल कोणाला? मतदान केंद्रे सज्ज

Fire in Nainital : उत्तराखंडच्या जंगलातील आग पोहचली शेताच्या बांधावर, एका महिलेचा होरपळून मृत्यू

Animal Ear Tagging : ...अन्यथा भरपाई अन् अनुदान नाही

Sunburn Crop : कोवळी रोपे वाचविण्यासाठी शेतकरी सरसावला

SCROLL FOR NEXT