cotton procurement
cotton procurement  
मुख्य बातम्या

कापूस खरेदीसाठी शेतकऱ्यांचा रास्तारोको

टीम अॅग्रोवन

यवतमाळ ः महागाव तालुक्‍यातील गुंज येथील सीसीआयच्या केंद्रावर एक हजारपेक्षा अधिक शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. यापैकी अवघ्या १७५ शेतकऱ्यांकडूनच कापसाची खरेदी करण्यात आली. उर्वरित शेतकऱ्यांचा कापूस पावसाळ्यापूर्वी घेणे शक्‍य नसल्याची जाणीव झालेल्या शेतकऱ्यांनी या विरोधात रास्तारोको करीत आपला रोष व्यक्‍त केला. तहसीलदार एस.एस. आदमुलवाड यांच्या आश्‍वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. सीसीआयने गुंज येथे मंजित जिनींग या केंद्रावर कापसाची खरेदी चालविली आहे. या केंद्रावर कापूस विक्रीसाठी १२७५ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. लॉकडाऊन नंतर खरेदी सुरु करण्यात आल्यानंतर नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांपैकी केवळ १७५ शेतकऱ्यांचाच कापूस खरेदी करण्यात आला. २२० वाहने जिनींगच्या परिसरात खरेदीअभावी उभी आहेत. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी खरेदी व्हावी आणि शेतकऱ्यांना खरिपासाठी पैशाची उपलब्धता व्हावी, अशी मागणी शेतकरी नेते मनिष जाधव यांनी केली होती. २७ मे रोजी मुख्यमंत्री आणि जिल्हा प्रशासनाकडे याविषयावर निवेदनही देण्यात आले होते. परंतु त्या निवेदनाची दखल न घेण्यात आल्याने मनिष जाधव यांच्या नेतृत्वात मंगळवारी (ता.२) गुंज मार्गावर रास्तारोको करण्यात आला.  सव्वा तास करण्यात आलेल्या या आंदोलनाची दखल घेत तहसीलदार एस.एस. आदमुलवाड, सहाय्यक निबंधक आर. टी. राठोड, सीसीआयचे ग्रेडर विधळे, मंजित जिनींगचे व्यवस्थाक सिंग यांनी रास्तारोकोच्या ठिकाणी येत शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी रोज ४५ ऐवजी १०० गाड्यांमधील कापसाचे मोजमाप व्हावे अशी मागणी करण्यात आली. त्यावर रोज ८० गाड्यांचे मोजमाप करण्याचे आश्‍वासन देण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Book Review : ऋग्वेदाच्या पौराणिक अन् वैज्ञानिक स्पष्टीकरणाचा प्रयत्न

Drought Monitoring : दुष्काळ पाहणी पथकांचा सोपस्कार

Interview with Dashrath Tambale, Director of Atma : सेंद्रिय किंवा नैसर्गिक शेतीची सक्ती नाहीच...

Rural Story : जागरण

Sugarcane Management : खोडवा उसाचे व्यवस्थापन

SCROLL FOR NEXT