भारनियमनाने त्रस्त शेतकऱ्यांचा ‘महावितरण’वर मोर्चा
भारनियमनाने त्रस्त शेतकऱ्यांचा ‘महावितरण’वर मोर्चा 
मुख्य बातम्या

भारनियमनाने त्रस्त शेतकऱ्यांचा ‘महावितरण’वर मोर्चा

टीम अॅग्रोवन

कुडित्रे, जि. कोल्हापूर (प्रतिनिधी) : शेतीपंपाला दिवसा वीजकपात केली जाते, दोन दिवस वीजकपात केल्याने कोगे व पाडळी खुर्द व परिसरातील संतप्त शेतकऱ्यांनी महावितरणच्या कोगे उपकेंद्रावर धडक मारली. या वेळी अधिकाऱ्यांना जाब विचारत धारेवर धरले व वीज भारनियमन रद्द न केल्यास महावितरण ताराबाई पार्क येथे बैलगाडीसह मोर्चा काढण्याचा इशारा दिला.  कोगे उपकेंद्रांतर्गत महे, सांगरूळ, बहिरेश्‍वर, वाकरे, पाडळी खुर्द, कसबा बीड, आरे येथे सुमारे दोन हजार शेतीपंपधारक आहेत. रात्रीची वीजकपात केली जाते. दोन दिवस दिवसा वीजकपात केल्याने संतप्त शेतकऱ्यांनी उपकेंद्रावर मोर्चा आणला.  तानाजी मोरे म्हणाले, ‘‘दोन दिवस सलग वीजकपात केली आहे. त्यामुळे शेतीची कामे खोळंबली आहेत. उन्हाळा वाढला असून, पिकांना २५ दिवस पाणी नाही. त्यामुळे पिके वाळू लागली आहेत. दिवसा वीज चालू असताना तांत्रिक बिघाड, सांगून वीजकपात केली जाते.’’  सरदार पाटील म्हणाले, ‘‘दोन दिवस वीज भारनियमन सुरू असताना कनिष्ठ अभियंता प्रवीण पाटील रजेवर कसे जातात. उपकेंद्रावर फोन उचलला जात नाही, माहिती व्यवस्थित दिली जात नाही. परिस्थिती न सुधारल्यास उपकेंद्रास टाळे ठोकू.’’ राजाराम पाटील, बाळासाहेब पाटील यांनी जाब विचारत अधिकाऱ्यांना धारेवर धरले.  ऑपरेटर आर. एस. कुंभार म्हणाले, ‘‘पुईखडी येथून तांत्रिक बिघाड असून, चंबुखडी येथून रोड मिळेना झाला आहे.’’ या वेळी शेतकरी रंगराव यादव, जोतीराम पाटील, गणपती मिठारी, नारायण मोरे, तानाजी पाटील, जी. डी. पाटील, वैभव व वरुटे आदी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Rain : वादळी पावसाने टोमॅटो, मिरची, भेंडीसह ऊस पीक उद्धवस्त, नुकसान भरपाई मिळणार कधी?

Konkan Ranmeva : कोकणच्या रानमेव्यावर वातावरणाचा परिणाम, अनेकांचे आर्थिक गणित कोलमडणार

Agrowon Podcast : हळदीचे भाव तेजीतच; कापूस, सोयाबीन, गहू, लिंबू यांचे काय आहेत दर पाहुयात?

Ethanol Production : कांदा उत्पादकांच्या पाठोपाठ ऊस उत्पादकांनाही सरकारनं घोषणा करून भूलवलं ? | शेतीच्या बातम्या

Maharashtra Rain : राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा; देशातील अनेक भागात तापमानाचा पारा ४२ ते ४६ अंशाच्या दरम्यान

SCROLL FOR NEXT