सुरळीत वीजपुरवठ्यासाठी शेतकऱ्यांचे ठिय्या आंदोलन
सुरळीत वीजपुरवठ्यासाठी शेतकऱ्यांचे ठिय्या आंदोलन 
मुख्य बातम्या

सुरळीत वीजपुरवठ्यासाठी शेतकऱ्यांचे ठिय्या आंदोलन

ॲग्रोवन वृत्तसेवा

वाशीम : वीजपुरवठा सुरळीत मिळावा यासाठी शनिवारी (ता. ३) जिल्ह्यातील रिठद उपकेंद्राच्या कार्यालयात स्वाभिमानी शेतकरी संघटना व शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन केले. वीजपुरवठा सुरळीत झाल्यानंतर दुपारी हे आंदोलन मागे घेतल्याची माहिती जिल्हाध्यक्ष दामोदर इंगोले यांनी दिली.  वीजबिल वसुलीसाठी वीज वितरण कंपनीने शेतकऱ्यांना विजेचा अर्धवट पुरवठा सुरू केला होता. कमी दाब, एकच फ्युज मिळत असल्याने सिंचनाचे काम होत नव्हते. पिके सुकली होती. यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलनाचा पवित्रा उचलला. जिल्हाध्यक्ष दामोदर इंगोले, पंढरी मापारी, गणेश मापारी, सुनील मापारी, विशाल जाधव, वैभव जाधव, गजानन इंगोले यांच्यासह शिरसाळा, दापोरी, सोमठाणा या गावातील नागरिकांनी ठिय्या आंदोलन सुरू केले. वीज कार्यालयात आंदोलन सुरू झाल्याने वीज प्रशासनाची एकच तारांबळ उडाली. याच ठिकाणी शेतकऱ्यांनी खिचडी शिजवत जेवणही घेतले. वीजपुरवठा सुरळीत होईपर्यंत कार्यालय सोडणार नसल्याच्या मागणीवर आंदोलक ठाम होते. त्यामुळे अखेरीस वीजपुरवठा सुरळीत करण्याचे आश्‍वासन देण्यात आले. त्यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले, अशी माहिती आंदोलकांनी दिली.  प्रतिक्रिया... वीजबिल भरूनही जर शेतकऱ्यांना तांत्रिक कारणे सांगत वीज कंपनी सुरळीत पुरवठा ठेवत नसेल तर याला जबाबदार असलेल्यांविरुद्ध कारवाई झाली पाहिजे. शेतकऱ्यांना त्रास देण्याचा प्रकार खपवून घेतला जाणार नाही.     - दामोदर इंगोले, जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, वाशीम

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Orange Farmer : निवडणूक काळात संत्रा उत्पादक उपेक्षित

Chara Chavani : चारा छावण्या सुरू करण्याची पशुपालकांची मागणी

Cotton Sowing : महाराष्ट्रात कापसाचा पेरा राहणार ४२ लाख हेक्टरवर

Animal Heat Stress : वाढत्या उष्म्याचा पशुधनाला धोका

Agriculture Technology : शेती तंत्रज्ञान, पिकांबाबत शेतकरी साक्षर असणे गरजेचे

SCROLL FOR NEXT