A farmer from Yeola planted a JCB on a pomegranate orchard
A farmer from Yeola planted a JCB on a pomegranate orchard 
मुख्य बातम्या

येवल्यातील शेतकऱ्याने डाळिंब बागेवर फिरवला जेसीबी

टीम अॅग्रोवन

नाशिक : गेल्या ६ वर्षांपूर्वी अडीच एकर क्षेत्रावर ८०० झाडांची लागवड होती. तेलकट डागाचा प्रादुर्भाव व अतिवृष्टीमुळे फळगळ वाढली. त्यातच गेल्या तीन वर्षांपासून अपेक्षित उत्पादन हाती आले नाही. त्यामुळे डाळिंब बागेवर जेसीबी फिरवण्याची दुर्दैवी वेळ येथील शेतकऱ्यांवर आली आहे.  

येवला तालुक्यातील शेतकरी गजानन जिवाजीराव देशमुख यांची अडीच एकर डाळिंब बाग होती. मात्र, चालू वर्षी अतिवृष्टीसह तेलकट डागाचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. सततच्या पावसामुळे जे काही हाती आले, त्या फळांना गुणवत्ता नव्हती. तेलकट डाग अधिक असल्याने बाजार भाव मिळाला नाही.

काढणीस आलेल्या फळांची विक्री स्थानिक बाजारात कोपरगाव येथे केली. त्यास १० ते १२ रुपये प्रतिकिलो सरासरी दर मिळाला. या क्षेत्रात अवघे २०० क्रेट डाळिंब म्हणजे ४० क्विंटल माल निघाला. 

चालू वर्षीच्या हंगामात दीड लाखांवर खर्च या क्षेत्राला आला. मात्र अवघे ४० हजार उत्पन्न मिळाल्याने खर्चाचा ताळमेळ बसला नाही. त्यात उत्पादन निम्म्यावर घटल्याने खर्चही वसूल झालेला नाही. परिणामी, या ३ वर्षांपासून सततच्या नुकसानीला कंटाळून शेतकऱ्याने बागेवर जेसीबी फिरवला.

अगोदर निसर्ग चक्रीवादळात पोल्ट्रीचे पत्रे उडून मोठे नुकसान झाले. त्यामुळे लाखो रुपयांची गुंतवणूक अडचणीत आली. त्यातच आता डाळिंब बागेत खर्च करून काही हाती येत नसल्याने कठोर अंतःकरणाने बाग तोडण्याचा निर्णय घेतला. - गजानन देशमुख, शेतकरी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Delhi Farmers' protest : भाजपच्या उमेदवारांविरोधात पंजाबमध्ये शेतकऱ्यांचा रोष वाढला; एसकेएमचा विरोध कायम

Lok Sabha Constituency : कोल्हापूर जिल्ह्यातील ३७ लाख ५० हजार मतदारांचा कौल कोणाला? मतदान केंद्रे सज्ज

Fire in Nainital : उत्तराखंडच्या जंगलातील आग पोहचली शेताच्या बांधावर, एका महिलेचा होरपळून मृत्यू

Animal Ear Tagging : ...अन्यथा भरपाई अन् अनुदान नाही

Sunburn Crop : कोवळी रोपे वाचविण्यासाठी शेतकरी सरसावला

SCROLL FOR NEXT