Vijay Wadettiwar
Vijay Wadettiwar  
मुख्य बातम्या

अतिवृष्टिग्रस्तांना सोमवारपासून मदत : विजय वडेट्टीवार

टीम अॅग्रोवन

मुंबई : अतिवृष्टी आणि परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत देण्याची ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले होती. त्यानुसार सोमवारपासून (ता.९) नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात होईल, अशी माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. राज्यात गेल्या महिन्यात अनेक भागात अतिवृष्टीने शेतीचे प्रचंड नुकसान झाले. ऐन काढणीवर आलेली पिके भुईसपाट झाली होती. उद्धव ठाकरे यांनी बांधावर जाऊन शेतीच्या नुकसानीची पाहणी केली होती. त्यानंतर बाधित शेतकऱ्यांसाठी १० हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले होते. ही मदत शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मिळेल, असे ठाकरे यांनी घोषित केले होते. या पार्श्वभूमीवर गुरुवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर विजय वडेट्टीवार यांनी शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या मदतीबद्दलची माहिती दिली. निवडणूक आयोगाला मदत वाटपासंदर्भात पत्रही दिले आहे. निवडणूक आयोगाकडून परवानगी मिळालेली आहे. त्यामुळे सोमवारपासून शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्यास सुरुवात होईल, असे वडेट्टीवार म्हणाले.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Stamp Duty : सातारा जिल्ह्यात पीककर्जासाठी ‘मुद्रांक शुल्क’ माफ

Onion Market : कांदा दरात घसरणीने उत्पादक अडचणीत

Water Scarcity : लोणी भापकर योजनेमुळे आठ गावे अन् ७८ वाड्या होणार टंचाईमुक्त

Co-operative Society : विकास सेवा सोसायट्यांवर आता ‘सीसीटीव्ही’चा ‘वॉच’

Silver Rate : चांदी दरात १४०० रुपयांची वाढ

SCROLL FOR NEXT